---Advertisement---

जळगाव जिल्ह्यात आढळले डेंग्यूचे संशयित रुग्ण

by team

---Advertisement---

जळगाव : डेंग्यूने जिल्ह्यात डोकेवर काढले आहे. तापमानातील बदल, अवकाळी पाऊस यामुळे डेंग्यूच्या डासांची पोषक असे वातावरण तयार झाले आहे. अशा दूषित वातावरणामुळे मुक्ताईंनगर तालुक्यातील नायगावडोंगरी या गावात डेंग्यूची लागण झाली आहे. मागील दोन दिवसात ७ संशयित रुग्णांची ४ रुग्णांचे तपासणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. तसेच यावल तालुक्यातील पाडळसे व जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे.

जळगाव तालुक्यासह जिल्ह्यात डेंग्यूसदृश्य आजारांची लागण झाली आहे. नायगावडोंगरी येथे मागील पाच महिन्यात १० रुग्ण आढळून आले आहेत. खबदारीचा उपाय म्हणून अंतुर्ली आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्र असून त्यांच्यावतीने साथीचा उद्रेक असेलेल्या ठिकाणांचे सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र असे पथक नियुक्त करण्यात आले आहे.

वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात डेंग्यूचा उद्रेक होण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाचे पथक याठिकाणी लक्ष केंद्रीत करीत आहेत. जिल्हाभरात अवकाळी झाल्याने ग्रामिण भागात डबके पाऊस साचलेल्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होत असून ग्रामिण भागातील रूग्णालयांमध्ये ओपीडी वाढली आहे. तीन गावांमध्ये रूग्ण आढळल्याने या भागात सर्वेक्षण सुरू झाले आहे. दरम्यान खासगी रूग्णालयात नायगाव याठिकाणी डेंग्यू रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण व तपासणी मोहिमेला वेग देण्यात आला आहे. तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांची तातडीने रक्ताची नमुने घेण्यात येत आहे.

नागरिकांनी डेंग्यूला आळा घालण्यासाठी कोरडा दिवस पाळून पाण्याचे साठे झाकून ठेवावेत. लक्षणे आढळल्यास त्वरीत तपासणी करावी.
डॉ. सचिन भायेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. जळगाव

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment