---Advertisement---

जळगावात राबिण्यात येणार अहिल्यादेवी गौरव अभियान ; डॉ. राधेश्याम चौधरी , पाहा व्हिडिओ

by team

---Advertisement---

जळगाव : आगामी 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 जयंती आहे . त्यांच्या जयंतीच्या या त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी देशभर अहिल्यादेवी गौरव अभियान राबवत आहे . त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवी चव्हाण व उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ना. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली 21 मे ते 31 मे या कालावधीमध्ये अहिल्यादेवी गौरव अभियान राबविण्यात येत आहे .जळगाव पश्चिम जिल्ह्यामधील पाच विधानसभा ,8 तालुके व 20 मंडले यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा गौरव करणारे त्यांच्या अभूतपूर्व आध्यात्मिक व सांस्कृतिक योगदानाचा योगदानाची उजळणी करणारे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष डॅा राधेश्याम चौधरी यांनी दिले. ते भाजप कार्यलयात शनिवार , २४ मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी उदय भालेराव, राजेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते.

डॉ . राधेश्याम चौधरी यांनी पुढे सांगितले की, अहिल्यादेवी गौरव अभियाना द्वारे अहिल्यादेवींच्या प्रेरणादायी आयुष्याचा समाजाला परिचय करून देणे, त्यांच्या सुशासनाची माहिती समाजापर्यंत पोहोचवणे व धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी अहिल्यादेवींनी केलेल्या कार्याची ओळख समाजाला करून देणे हा प्रमुख उद्देश या अभियानाचा आहे.

या अभियाना अंतर्गत अहिल्यादेवींच्या गौरवार्थ काही कार्यक्रम तर त्यांच्या जीवनपटाचा जीवनपटाची माहिती दर्शवणारी चित्रप्रदर्शने तसेच वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा यांचे आयोजन देखील करण्यात आलेले आहेत.समाजातील युवा वर्ग महिला वर्ग ,बुद्धीजीवी,पत्रकार आदींचा समावेश असलेल्या अनेक गतिविधि या दहा दिवसात जिल्हाभर होणार आहेत.

या अभियानाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी भारताची सांस्कृतिक चेतना टिकवण्यासाठी अध्यात्मिक वर्षाचे जतन करण्यासाठी तसेच महिला सबलीकरणाच्या दृष्टीने व सामाजिक सुरणाच्या दृष्टीने घेतलेले सुशासनाचे निर्णय यांचं विद्यमान केंद्रातील मोदी सरकार व महाराष्ट्रातील देवेंद्रजींचे सरकार यांच्या कार्यपद्धती दिसणारे प्रतिबिंब देखील जनतेसमोर नेण्याचा प्रयत्न राहील.

महाराष्ट्रातील देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातील सरकारनं अहिल्यादेवींच्या चोंडी या जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी 681 कोटी रुपये मंजूर केले आहेत. अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर असं नामकरण केलेले आहे .सोलापूर विद्यापीठाचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर असं करण्यात आलेला आहे.आणि त्याचबरोबर बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आलेला आहे. एकंदरीत केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा सन्मान करण्याच्या दृष्टीने अनेक ठोस पावलं उचललेली आहेत.


भाजपच्या पश्चिम जिल्ह्यामध्ये 20 मंडळांमध्ये अनेक कार्यक्रमांचं यशस्वी नियोजन व आयोजन करण्यासाठी 40 ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची निवड व नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे त्याची यादी सोबत देत आहे,

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment