---Advertisement---

कासोदा येथे भरला २३ वर्षांनी आठवणींचा वर्ग

by team

---Advertisement---

कासोदा : येथील साधना माध्यमिक विद्यालय शाखा वसंत साखर कारखाना यांच्या वतीने साधना विद्यालयात २००१/२००२ च्या दहावी (क) बॅच विद्यार्थ्यांचा २३ वर्षानंतर स्नेहमेळावा अर्थात वर्ग भरविण्यात आला. हा मेळावा माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त केली, यासोबतच शाहीद दत्तात्रय पाटील यांच्या वीरपत्नी तथा माजी विद्यार्थिनी ज्योती पाटील यांना गौरविण्यात आले.

स्नेहमेळाव्याचा प्रारंभ सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आला. अध्यक्षस्थानी सी.जी. पाटील हे होते. याप्रसंगी शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक बेडसे, तसेच ज्येष्ठ शिक्षक पांडुरंग पाटील, एस. एम. पाटील, व्ही. एन. पाटील, पी. डी. रवंदळे , एन.एन. पाटील, अमृत पाटील हे उपस्थित होते. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शाल, श्रीफळ व भेट वस्तू देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. हा स्नेहमेळावा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. यावेळी शिक्षकांनी आठवणींना उजाळा दिला. तसेच विद्यार्थ्यांनी आपला संक्षिप्त परिचयासह मनोगत व्यक्त केले.

या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी ब्लुटूथ साऊंड सिस्टीम भेट दिली. या स्नेहमेळाव्यात जवळपास ४५ विद्यार्थी, विद्यार्थीनींनी सहभागी झाले होते. बालमित्रांना २३ वर्षानंतर पुन्हा भेटल्याचा मनस्वी आनंद झाला. यावेळी माजी विद्यार्थिनी ज्योती पाटील यांना शहीद दत्तात्रय पाटील यांच्या वीरपत्नी म्हणून साडी देऊन गौरवण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक राजशेखर सोनवणे व ज्येष्ठ बंधू शेखर पाटील यांनी केले. स्नेहमेळाव्याने सर्वाना शालेय जीवनात नेले. भविष्यात पुन्हा असाच कार्यक्रम घेण्याचे सर्वानुमते ठरले. यशस्वीतेसाठी भुषण पाटील, चंद्रकांत चव्हाण, सुशील पाटील,लक्ष्मीकांत नेरपगार, सतीश सोनवणे,विशाल पाटील,अमोल पवार, मिथुन देशमुख व सर्व मित्र परिवार यांनी मेहनत घेतली तसेच शिक्षेतर कर्मचारी यांनी कामकाज पहिले

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment