---Advertisement---

धनंजय मुंडेंना ‘क्लीनचिट’ मिळाली तर मी राजीनामा देईन ! : छगन भुजबळ

by team

---Advertisement---


नाशिक :
मंत्री छगन भुजबळ यांनी उद्या जर धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे विधान केले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात नव्यानेच छगन भुजबळ यांच्याकडे मंत्रिपद देण्यात आले आहे. तसेच कॉग्रेस जेव्हा फुटली तेव्हा मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती, पण मी शरद पवारांसोबत गेलो, असेही ना. भुजबळ यांनी म्हणाले आहेत.


एका मुलाखतीत छगन भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला की, धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात आले तर तुम्ही काय करणार? यावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले, उद्या जर धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घ्यायचे ठरले तर माझी काही हरकत नाही. मी या मंत्रिमंडळात पुन्हा आलो आहे, सन्मानाने मला परत बोलावले. धनंजय मुंडे सगळ्यातून मुक्त झाले, त्यांची सगळी लाईन क्लियर झाली तर मी राजीनामा देईन.

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, जेव्हा मंत्रिपद मिळाले नव्हते तेव्हा अनेक विचार येत होते आणि खंत वाटत होती. मी आणि अजितदादा बोलत नव्हतो. अजितदादांच्या घरच्च्या कार्यक्रमाला गेलो नाही. पण मी पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहिलो, असे म्हणत ना. भुजबळ यांनी अजित पवारांशी अबोला धरला होता असे कबूल केले आहे. ना. छगन भुजबळ म्हणाले, शरद पवारांनी जेव्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा सुप्रिया सुळेला पक्षाचे अध्यक्ष करायचे, सरकारमध्ये जायचे असे ठरले होते. यामध्ये पवार साहेब कुठेच असणार नाहीत असेही ठरले होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment