---Advertisement---

राष्ट्रीय महामार्गासाठी शेतजमीन देण्यास शेतकऱ्यांचा  विरोध, भुसंपादन प्रकिया रद्द करण्याची मागणी 

by team

---Advertisement---

रावेर : राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ बिई तळोदा ते बुहाणपुर या महामार्गाच्या चौपदरणासाठी शेतजमीन भुसंपादन करु नये. शेतजमीन गेल्यास अनेक शेतकरी भुमीहीन होतील. हे संकट टाळण्यासाठी भुसंपादन प्रकिया रद्द करण्यात यावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी  तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्र ७५३ बिई तळोदा ते बुहाणपुर या महामार्गाच्या चौपदरणासाठी भुसांपदन करण्यासाठी  फैजपुर भाग प्रांताधिकारी  यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. या महामार्गाच्याकामी रावेर तालुक्यातील भातखेडा, रावेर, कर्जाद, पातोंडी, पुनखेडा, तामसवाडी, खिरवड, वाघोड, मोरगाव बु, मोरगाव खुर्द, अटवाडे, अजनाड, खानापुर चोरवड या शिवारातील शेतजमीनीचे भुसांपदन केले जाणार आहे. या शेतजमीनी ह्या अल्पभुधारक शेतकऱ्याच्या आहेत. महामार्गाच्या कामी भुसांपदन झाल्यास शेतजमीनीचे गटाचे विभाजन, तुकडे होतील. गटाचे विभाजन व तुकडे झाल्यास शेतकऱ्यांना वहिवाटणे व कसणे फार जिकरीचे होईल.

सदरची शेतजमीन ही अतिशय काळी कसदार, सुपीक व बारमाही केळी बागायती अशी शेतजमीन आहे. बाजारपेठेत तसेच परदेशात सुध्दा मोठया प्रमाणात केळीला मोठी मागणी आहे. शेतजमीन ही वहिवाटण्यासाठी, केळीची तसेच इतर पिकाची लागवड करण्यासाठी उपयुक्त राहणार नाही. शिवारातील महामार्गाच्या कामी शेतजमीनीचे भुसंपादन झाल्यास उपजिवीकचे एकमेव साधन जाईल व शेतकऱ्यांना उपसमारीचे वेळ येईल. शेतकऱ्यांवरील हे संकट शासनाने टाळावे . या शिवारातील शेतजमीनीमधुन राष्ट्रीय महामार्गासाठी शेतजमीनीचे भुसंपादन करू नये.  भुसंपादन  पुढील प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे 

यांची होती उपस्थिती 

 शेतकऱ्यांनी मागणी निवेदन नायब तहसीलदार संजय तायडे यांना दिले. यावेळी हरीश गणवाणी, भागवत पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, सुरेश पाटील, पुंडलिक पाटील,  रामदास पाटील, अँड आर. आर. पाटील, धिरज पाटील, अनिल पाटील, योगेश दलाल, प्रशांत चौधरी, रवींद्र पाटील, संजय पाटील, रणजीत पाटील, जितेंद्र पाटील, प्रभाकर लासुरकर, विकास पाटील, सुधाकर बोरसे, दिवाकर पाटील, सुधाकर पाटील, यशवंत पाटील, किरण सांगळे, गजानन पाटील, शंकर पाटील, पंकज चौधरी, अमोल चौधरी, मयूर महाजन, देविदास बोरसे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

हा राष्ट्रीय महामार्ग मुळ मार्गावरच करावा

राष्ट्रीय महामार्ग क्र ७५३ बिई तळोदा ते बुऱ्हाणपुर हा महामार्ग चौपदरीकरणासाठी रावेर तालुक्यातुन तसेच शहरातून जाणारा जुना चालु रस्ता सोयीचा आहे. यामुळ मार्गावर चौपदरीकरणाचे काम करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 दि.३ जुन रोजी बैठक 

 राज्य शासनाने मंगळवार ३ जुन रोजी प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या उपस्थितीत याबाबत शेतकऱ्यांची बैठक फैजपूर येथे   आयोजित केली आहे . शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आपली भूमिका मांडण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment