---Advertisement---

दुचाकी लावण्याच्या कारणावरून युवकासह ४-५ जणांना जबर मारहाण

by team

---Advertisement---

एरंडोल : येथे गाढवे गल्ली परिसरात मोटरसायकल लावण्याच्या कारणावरून अमोल कैलास पाटील (वय-३१ वर्षे )याच्यासह कुटुंबातील ४ते ५ जणांना लाठ्याकाठ्यांनी व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पांडव वाड्या मागे घडली. यात अमोल पाटील हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.  या घटनेबाबत एरंडोल पोलिस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला असून प्रमुख आप्पा पाटील यास ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान पोलिस उपविभागीय अधिकारी अमळनेर विनायक कोते यांनी रात्री एरंडोल पोलिस स्टेशनला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. दरम्यान पोलिस उपविभागीय अधिकारी अमळनेर विनायक कोते यांनी रात्री एरंडोल पोलिस स्टेशनला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

२५ मे रोजी अमोल याने त्याची दुचाकी घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत लावली होती. या कारणावरुन तुकाराम उर्फ अप्पा सिताराम पाटील, रोहित उर्फ बंटी तुकाराम पाटील, आशिष उर्फ आशू तुकाराम पाटील, दिपक उर्फ गोलू नामदेव पाटील, उषाबाई तुकाराम पाटील (सर्व रा.गाढवे गल्ली एरंडोल ) यांनी अमोल सोबत वाद घातला.

या सर्व संशयितांनी एकत्र येऊन रोहित उर्फ बंटी व आशिष उर्फ आशू यांनी अमोल पाटील यास शिवीगाळ करत त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच अमोल यास काँक्रिटिकरण झालेल्या रस्त्यावर जोरात आपटून त्याचे डोके फोडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. भांडण सोडवित असताना सचिन कैलास पाटील, संजय पाटील, दिपाली पाटील, जयेश पाटील यांना ही मारहाण करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड हे करत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment