जळगाव : पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध भागांत सांडपाण्यांचा प्रवाहाला अडथळा ठरणारे अतिक्रमण मंगळवारी (२७ मे ) काढण्यात आले. ही कार्यवाही आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे व उपायुक्त धनश्री शिंदे यांच्या निदर्शनानुसार करण्यात आली. दरम्यान, नागरिकांनी अतिक्रमण पथकाशी हुज्जत घातल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

शहरातील वार्ड क्रं. ८ व ९ मधील एस.एम.आय.टी. कॉलेज रोडवरील सिमेंट ढापे काढण्यात आले. तसेच मयुरेश प्लाझा, श्यामपर्व अपार्टमेंट व शिंदे नगर नाल्यावरील सिमेंट ढापे काढण्यात आले. यासोबतच जिल्हा बँक कॉलनी नाल्यावर दोन्ही बाजू व शालिनी नगर मेन रोड नाल्यावर वार्ड क्रं. १९ मधील छत्रपती कॉलनी ते जिजाऊ नगर रिक्षा स्टॉप ते गिरणा पपींग रोड वार्ड क्रं. १२ मधील रामदास कॉलनी आस्वाद चौक पर्यंत, एम.जे. कॉलेज रोड ते अग्रवाल हॉस्पीट पर्यंत, प्रभात चौक ते अग्रवाल हॉस्पीटलपर्यंत तसेच चर्च रोडपासून बाबुराव चौक पर्यंत पक्के सिमेंटचे ओटे, ढापे सांडपाण्याचा प्रवाह ज्या ठिकाणी अडथळा येत असेल अशा ठिकाणांचे अतिक्रमण काढण्यात आले.

नागरिकांनी घातला वाद
दरम्यान, एसएमआयटी कॉलेज समोरुन जाणाऱ्या गटारीवर नागरिकांनी सिमेंटचे ढापे टाकल्याचे आढळून आले. हे ढापे तोडत असतांना नागरिकांनी अतिक्रमण निर्मूलन पथकासोबत वाद घातला. आम्ही, वापर कसा करायचा असा प्रश्न या नागरिकांनी पथकासमोर उपस्थित करत वाद घातला. महापालिकेचे काही कर्मचाऱ्यांनी गटारीत उतरून त्यांनी गटारातील घाण साफ केली.

ही कार्यवाही प्रभाग अधिकारी, प्र.स.क्रं. १ व ४ सहा. आयुक्त उदय पाटील यांच्या मागदर्शनाखाली मुख्य स्वच्छता निरिक्षक जितेंद्र किरंगे, रमेश कांबळे व अतिक्रमण अधिक्षक संजय ठाकुर यांनी अतिक्रमण धारकांवर कारवाई करुन पथकात अतिक्रमण विभागाचे मोकादम नाना कोळी, नितीन भालेराव आदी उपस्थित होते.