---Advertisement---

नंदुरबार जिल्ह्यातून 88 गोवंश जनावरांची सुटका : 9 आरोपींवर गुन्हा दाखल

---Advertisement---

नंदुरबार : आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने जिल्ह्याभरात गोवंश जनावरे अवैधरित्या कत्तल करण्याचे इराद्याने डांबून ठेवण्यात आलेले असल्याची गोपनिय माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांना मिळाली होती. यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत महाराष्ट्र पशु संरक्षण व छळ प्रतिबंध अधिनियमाद्वारे कारवाई करण्यात आली.या कारवाईत 9 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 88 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली आहे .

या कारवाईत नवापूर पोलीस ठाण्याचे हद्दीत पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व त्यांच्या पथकाने एजाज अब्दुलगणी शेख (रा. राजीव नगर, नवापूर जि. नंदुरबार) याच्या ताब्यातून एकुण 57 गोवंश जनावरांची सुटका केली. शहादा पोलीस ठाण्याचे हद्दीत पोलीस निरीक्षक निलेश देसले व पथकाने इरफान मुक्तार खान (रा. अमन कॉलनी, मलोनी, ता. शहादा जि. नंदुरबार) याच्या ताब्यातून एकुण 18 गोवंश जनावरांची सुटका केली आहे.

तसेच शहर पोलीस ठाण्याचे हद्दीत पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ व पथकाने शेख यासीन अरमान कुरेशी ( रा. बिस्मील्ला चौक, नंदुरबार), फिरोज खान जहीर खान कुरेशी ( रा. कुरेशी मोहल्ला, नंदुरबार), आसिफ मरजान कुरेशी ( रा. कुरेशी मोहल्ला, नंदुरबार), कुरेशी जाविद नवाब ( रा. अलिसाब मोहल्ला, नंदुरबार), जफ्फर ऊर्फ शंभू आमन कुरेशी ( रा. बिस्मील्ला चौक, नंदुरबार) आजीम शेख शहाबुद्दीन कुरेशी ( रा. कुरेशी मोहल्ला, नंदुरबार) जब्बार सत्तार कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, नंदुरबार) यांच्या ताब्यातुन एकुण 13 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली आहे.

या कारवाईत 7 लाख 6 हजार 300 रुपये किमतीची एकुण 88 गोवंश जनावरे हे अवैधरित्या कत्तल करण्याचे इराद्याने निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत मिळुन आल्याने सर्व जनावरांची सुटका करुन त्यांची तातडीने चारापाण्याची व्यवस्था करुन त्यांना गोशाळेत दाखल करण्यात आले आहे. नमुद आरोपींवर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5, 5 (ए), 5 (बी), 9 व प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 इ. कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, नंदुरबार शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापुर, शहादा व शहर पोलीसांकडून करण्यात आली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment