---Advertisement---

जळगावात श्री महेश नवमीनिमित्त शोभायात्रा : सजीव देखाव्यासह भव्य शिवलिंग ठरले आकर्षण

---Advertisement---

श्री माहेश्वरी समाज उत्पत्ती दिनानिमित्त शहरात श्री महेश नवमी उत्सव २०२५ साजरा होत आहे. माहेश्वरी समाजातार्फे बुधवार ( ४ जून ) रोजी महेश नवमी उत्सहात साजरी करण्यात आली. श्री महेश नवमीनिमित्ताने दिवसभरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

सकाळी ६ वाजता बालाजी पेठ येथे भगवान महेश यांचा अभिषेक व महाआरतीने धार्मिक कार्यक्रमाला सुरवात झाली. त्यानंतर महाआरती करण्यात आली. सकाळी ८ वाजता पांजरपोळ गोशाळेत गोमातेला लापशी वितरित करण्यात आली. तसेच बाहेती पाणपोई जवळ अन्नदान वाटप कार्यक्रम घेण्यात आला. माहेश्वरी समाजातर्फे सकाळी १० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले.

महेश नवमी निमित्त अयोध्या नगर येथील शिव मंदिरात ६१ किलो आंब्याची आरास करण्यात आली होती. माहेश्वरी बोर्डिंग येथे सकाळी ११ वाजल्यापासून रात्रीपर्यंत रक्तदान शिबिर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची रक्तपेढी, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, गोळवलकर रक्तपेढी यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले. यात २३२ रक्तपिशव्या संकलित झाल्या. समाजातील अनेक बांधवांनी या शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले. दुपारी माहेश्वरी बोर्डिंग येथून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. सुरुवातीला बग्गी सजवण्यात आली होती.

शोभायात्रेत भव्य शिवलिंग लक्ष वेधून घेत होते. तर सोबत एका वाहनावर भगवान महादेवाची भव्य प्रतिमा सजविण्यात आली होती. दुसऱ्या वाहनात भगवान शिव व पार्वती यांच्या वेशभूषेत लहान बालके सहभागी झाले होते. यावेळी महिला-पुरुषांसह लहान मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

शोभायात्रा माहेश्वरी बोर्डिंग येथून नेहरू चौक, टॉवर चौक, घाणेकर चौक, दाणा बाजार, नवी पेठ, शिवतीर्थ चौक मार्गे पुन्हा माहेश्वरी बोर्डिंग येथे विसर्जित झाली. याठिकाणी महेश वंदना भाविकांनी सादर केली. शोभायात्रा व श्री महेश नवमी उत्सवासाठी माहेश्वरी समाजाच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन नियोजन करीत परिश्रम घेतले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment