चोपडा तालुक्यातील आदिवासी भागातील बोरमढी येथील एका विवाहितेची रस्त्यावर प्रसूती झात्याच्या गंभीर प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे. या घटनेची त्रिस्तरीय चौकशी समितीद्वारे सखोल व पारदर्शक चौकशी करण्यात आली असून, चौकशीदरम्यान मिळालेले जबाब, उपकेंद्र कजनि येथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोषी आढळलेल्या आरोग्य सेविका आणि कंत्राटी वाहन चालक यांच्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी दिली आहे.
डॉ. भायेकर यांनी सांगितले की, ही चौकशी प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आली. प्रकरणातील तक्रारदार प्रतिभा शिंदे यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी स्वतंत्र संधी आणि लेखी पत्राद्वारे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, वेळेत प्रतिसाद न
आल्याने आणि चौकशी अहवाल सादर करण्यासाठी ठरवून दिलेल्या दोन दिवसांच्या मुदतीच्या मयदित वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे चौकशी समितीने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आपला अहवाल सादर केला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असत्यामुळे कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता संबंधित १३ जणांचे जबाब, दस्तऐवज आणि घडलेली घटना यांच्या आधारे पारदर्शक पद्धतीने चौकशी करण्यात आली आहे. दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर आवश्यक ती प्रशासकीय कारवाई निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सागितले. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या जातील.