16 मे पासून प्रगणकांकडून गृहभेटी जनगणना कर्मचाऱ्यास योग्य आवश्यक माहिती द्या-

---Advertisement---

 

खोटी दिशाभूल करणारी माहिती देणे टाळा ; जिल्हा जनगणना अधिकारी

जळगाव, १४ मे : भारताची जनगणना दर दहा वर्षांनी केली जाते. कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांमुळे 2021 ची जनगणना लांबणीवर पडली होती. त्यानुसार देशातील 16वी जनगणना 2027 अंतर्गत दोन टप्प्यात करण्यात येत आहे. यात पहिला टप्पा 1 ते 15 मे नागरीकांनी स्वताच्या मोबाईल ॲपवर अधिकृत वेबसाईटवर नोंदवलेली स्व गणना कालावधी संपुष्टात येत आहे. तर दुसरा टप्पा 15 मे ते 14 जून दरम्यान प्रशासनपातळीवर नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणकांमार्फत गृहभेटीव्दारे घरगणना नोंदी करण्यात येत आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात नियुक्त जनगणना कर्मचारी गृहभेटीस आल्यावर त्यांना योग्य आवश्यक ती माहिती द्या, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

घरगणना गृहभेटीअंतर्गत आलेल्या प्रगणकांना योग्य आणि आवश्यक ती माहिती नागरीकांनी द्यावी. चुकीची दिशाभूल करणारी माहिती देणे वा गंमत करणे किंवा नकार देणे चुकीचे आहे.

जनगणना केवळ सरकारी आकडेवारी नसून या जनगणनेव्दारे नागरीकांची आर्थीक, शैक्षणिक वा सामाजिक साक्षरता स्थितीनुसार जनसुविधांची पूर्तता व योजनांची अंमलबजावणी करणे सोयीचे होणार आहे.

त्याअंतर्गत जिल्ह्यात 15 तालुकास्तरासह 19 नगरपरिषद, महानगरपालिका क्षेत्रात जनगणनेसाठी 7 हजार 164 प्रगणक व 1 हजार 225 पर्यवेक्षक असे सुमारे 8हजार 389 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

स्वगणना सरासरी 87 टक्के
नागरिकांना मोबाईल ॲपवर जनगणनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपल्या मोबाइल नंबरद्वारे नोंदणी करून 34 प्रश्नांची उत्तरे ऑनलाइन भरता येतात. यामुळे प्रगणकांचा आणि नागरिकांचा वेळ वाचणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 25 हजार 872 कुटुंबप्रमुख सरासरी 87 टक्के माहिती स्वगणनेंतर्गत नोंदवण्यात आली आहे.

आधार पॅनकार्ड वा बँक खात्यासह ओटीपी देवू नका
प्रगणक कधीही नागरिकांकडे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा बँक खात्याची माहिती (ओटीपी) मागत नाहीत. केवळ दिलेल्या प्रश्नांची माहिती द्यायची असते. गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका. जनगणना कायदा 1948 च्या कलम 11 (1) (ड) नुसार प्रगणकाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार देणे किंवा हेतुपुरस्सर खोटी माहिती देणे हा अदखलपात्र गुन्हा असून स्व-गणना करताना चुकीची माहिती भरू नये तसेच प्रगणक घरी आल्यानंतर त्याला चुकीची माहिती देऊ नये असे प्रशासनाने म्हटले आहे.

निवारा, शैक्षणिक, आर्थिक तसेच सुविधांची माहिती
जळगाव जिल्ह्यात नियोजित जनगणना 2027 (16 वी जनगणना) कार्यासाठी, ग्रामीण व शहरी भाग मिळून एकूण 8हजार 389 प्रगणक व पर्यवेक्षक (राखीवसह) नियुक्त करण्यात आले आहेत. जनगणना कर्मचारी घरोघरी जाऊन गृहभेटीव्दारे डिजिटल माध्यमाद्वारे (मोबाइल ॲप) माहिती संकलित करतील. पहिल्या टप्यातील गृहगणना व घरयादीसाठी 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या दरम्यानची मोहीम असून, स्व-गणनेची सुविधाही उपलब्ध आहे.

जनगणनेत प्रगणकांकडून कुटुंबातील व्यक्तींची संख्या, शिक्षण, व्यवसाय, घरातील सुविधा अशा एकूण 34 विविध प्रश्नांची माहिती घेतली जाणार आहे. ही सर्व उत्तरे अचूक देणे बंधनकारक आहे.

नागरिकाची वैयक्तिक माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय
नागरिकांच्या सुविधेसाठी 15 मेपर्यंत ‘स्वगणना’ करण्याची संधी उपलब्ध आहे. 16 मेपासून प्रगणक घरोघरी येऊन माहिती संकलित करतील. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने प्रगणकांना पूर्ण सहकार्य करून आपली अचूक माहिती नोंदवावी. जनगणनेत माहिती नाकारणे किंवा खोटी माहिती देणे हा कायदेशीर गुन्हा आहे. नागरिकाची वैयक्तिक माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय आहे.
वैशाली चव्हाण
जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी जळगाव

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---