जळगाव महापालिकेच्या महासभेत एसी बंद; ४५ अंश तापमानात नगरसेवक- अधिकारी घामाघूम

---Advertisement---

 

जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या महासभेत एसी बंद असल्याने नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. शहराचे तापमान ४५ अंशांवर पोहोचले असताना सभागृहातील वातानुकूलित यंत्रणा अनेक दिवसांपासून बंद असल्याने महासभेत उपस्थित सर्वांचीच अक्षरशः गैरसोय झाली.
सभागृहातील वाढत्या उकाड्यामुळे काही ज्येष्ठ नगरसेविका महासभा अर्धवट सोडून निघून गेल्याने नगरसेवक आक्रमक झाले. महासभा सुरू असताना अनेक नगरसेवक आणि अधिकारी रुमाल तसेच फाईल व कागदपत्रांनी हवा घेताना दिसून आले. उकाड्यामुळे सभागृहात काही काळ अस्वस्थ वातावरणही निर्माण झाले होते.


यावेळी नगरसेवकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत सभागृहात किमान सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. बंद पडलेले एसी तातडीने दुरुस्त करावेत किंवा किमान पंखे आणि कुलरची व्यवस्था करावी, अशी मागणी महासभेत करण्यात आली.
दरम्यान, महापौर, उपमहापौर आणि आयुक्त बसलेल्या व्यासपीठावर मात्र एसी आणि पंख्यांची व्यवस्था सुरू असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. सभागृहातील सर्व सदस्यांसाठी समान सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही यावेळी पुढे आली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---