---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : आगामी काळात होणाऱ्या सार्वजनिक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातून १६ गुन्हेगारांना दोन दिवसांसाठी शहर सोडण्याचे आदेश प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिले आहेत. ही कारवाई पोलीस प्रशासनाच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील शांतता अबाधित रहावी आणि सार्वजनिक सण व उत्सवांदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने शहरातील हिस्ट्रीशिटर गुन्हेगारांची यादी करून त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्याकडे दाखल केला होता. त्यानुसार प्रांताधिकाऱ्यांनी हद्दपारीचे आदेश जारी केले.
यांना केले हद्दपार
एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील शेख शकील शेख चांद रा.उमर मस्जिद मास्टर कॉलनी, आसीफ खान लतीफ खान रा. ईस्लामपुरा शनिपेठ, वसिम रहीम कुरेशी, रा. तांबापुरा, शेख कलीम शेख सलीम रा. भिलपुरा शनिपेठ, बबल्या रहेमान कुरेशी रा. ईस्लामपुरा शनिपेठ, रईस शेख सत्तार कुरेशी रा. मास्टर कॉलनी, मेहरूण, निहाल शेख युनुस रा. शावलिया मशीदजवळ, शेख युनुस ऊर्फ कालू शेख बुरहान रा. शावलिया मशीदजवळ, युसुफ खान समशेर रा.शावलिया मशीदजवळ, यांच्यावर भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ कलम १६३ (२) नुसार ७ जूनच्या रात्री ८ वाजेपासून ते ९ जूनच्या सकाळी ८ वाजेपर्यंत शहरातून हद्दपार करण्यात आले.
तसेच रामानंदनगर पोलीस ठाणे हद्दीतील लखन संतोष भोई, रा. खंडेराव नगर, राम उर्फ बारकू संतोष भोई रा. खंडेराव नगर, गणेश बुधा सोनवणे रा. समता नगर, सागर कपील भोई रा. खंडेराव नगर, समीर सलीम शेख रा. आझाद नगर, सद्दाम जुम्मा पिंजारी रा. खंडेराव नगर, राकेश मिलिंद जाधव रा. मढी चौक, पिंप्राळा या गुन्हेगारांना ६ जून ते रात्री ८ ते ८ जूनच्या सकाळी ८ वाजेपर्यंत शहराबाहेर हद्दपार करण्यात आले आहे.