---Advertisement---

पैसे न देता इतरांना लावले कामावर, मजुरांनी थेट ठेकेदाराच्या भावाला संपवलं, अखेर पाच आरोपींना अटक

---Advertisement---

अमळनेर : कामाचे पैसे न देता इतरांना कामावर लावल्याच्या रागातून मजुरांकडून ठेकेदाराच्या भावाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना पातोंडा येथे घडली होती. घटनेनंतर फरार झालेल्या पाच आरोपींना अमळनेर पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली आहे.

पातोंडा येथे विजेच्या तारा ओढण्यासाठी कैलास शामसिंग प्रजापती यांनी मजुरांचे कामाचे पैसे देता, दुसरे कामगार कामावर आणले होते. या रागातून मजुरांनी त्यांना लोखंडी पाईप , लोखंडी पहारने हातावर, पायांवर , तोंडावर अमानुषपणे मारहाण केली होती. कैलास हे रात्रभर विका सोसायटी कार्यालयात बेशुद्ध पडून होते. सकाळी त्यांना उपचारासाठी अमळनेरहून धुळे व नंतर इंदोरला दवाखाण्यात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान कैलास यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी हे फरार झाले होते. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवून पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , हेडकॉन्स्टेबल विजय भोई , पोलीस राहुल गोकुळ पाटील व राहुल नारायण पाटील यांना आरोपीना शोध घेण्यासाठी रवाना केले होते. आरोपी मध्यप्रदेशातील दुर्गम भागात विविध ठिकाणी पळून गेले होते.

पोलीस पथकाने मोबाईल सेलचे गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांचे तांत्रिक सहाय्य घेत गोपाल साहुलाल धुर्वे , वय ३५ , पंकज उमरावसिंग शिलु वय २७ ,सलीम निर्मलशहा धुर्वे वय २२ , रोहित बुद्धसिंग शिलु वय १९ आणि शिवम फुलसिंग शिलु वय १८ सर्व रा बीजाधाना पो. ईटावा ता तामिया जि छिंदवाडा मध्यप्रदेश याना मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने सुमारे १०० ते १५० किमी परिसरातून विबिध डोंगर दऱ्यातून अटक केली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment