क्रूर घटनेने बीड हादरलं! घरातून उचलून गावाबाहेर नेलं; विवाहितेवर अत्याचार केला, गावाच्या चावडीसमोर रात्रभर बांधून ठेवले…… धक्कादायक घटना….!

---Advertisement---

 

महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यात मानवतेला काळिमा फासणारी पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन विवाहित तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित तरुणी ही आपल्या पतीसोबत घरात झोपलेली असताना आरोपीने रात्री उशिरा घरात प्रवेश केला. उकाडा असल्यामुळे घराचा दरवाजा उघडा ठेवण्यात आला होता. याचाच फायदा घेत आरोपीने घरात शिरून तरुणीला जबरदस्तीने उचलून गावाबाहेर नेले. त्यानंतर नदीपात्राजवळ तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

घटनेदरम्यान पीडितेने मदतीसाठी ओरडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने तिचे तोंड दाबून ठेवले. अत्याचारानंतर आरोपीने त्या तरुणीला गावात आणून चावडीसमोरील खांबाला दोरखंडाने बांधून ठेवले. सकाळी शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने मदतीसाठी याचना केली. मात्र काही काळ तिच्याकडे कोणी लक्ष दिले नसल्याचे सांगितले जात आहे. अखेर तिच्या नातेवाईकांनी तिला तेथून सोडवून घरी नेले.

ही संपूर्ण घटना 10 मार्च रोजी घडल्याचे बोललं जात आहे. भीतीपोटी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी काही काळ हा प्रकार लपवून ठेवला होता. मात्र दोन दिवसांनंतर पीडित मुलीने आई आणि मामासोबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी वैभव पटेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पीडित तरुणी ही अल्पवयीन असल्याचे तपासात समोर आले असून या प्रकरणात आणखी काही जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून पुढील चौकशीत आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---