---Advertisement---
मैत्रीच्या नात्यात विश्वास, समजूत आणि साथ या तीन गोष्टींनी एकमेकांना साथ देणं सोपं ठरतं. मात्र मैत्रीचं हे नातं इतर सर्व नात्यांपेक्षा काहीसं वेगळं असतं. आदर्श मैत्रीचे अनेक उदाहरणं आज आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो परंतु संशयाच्या नावाखाली मैत्रीचा भयानक शेवट देखील आपण पाहिला आहे आज अशीच एक घटना ही समोर आलेली आहे. बहिणी सोबत अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून एका मित्राने दुसऱ्या जिवलग मित्राचा क्रूर पद्धतीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी मित्राने स्वतः पोलीस ठाण्यात आत्मसर्पण केला आहे. पोलीस स्टेशन येथे जाऊन त्यानेच माझ्या मित्राचा मी खून केला अशी कबुली देखील दिली आहे या संपूर्ण घटनेने संशयाच्या भूताने आरोपी आणि मृत अशा दोघांचंही आयुष्य उध्वस्त झालं आहे.
या घटनेत नेमकं काय घडलं ?
राजस्थानच्या राजकोट शहरात ही घटना घडली राजकोट शहरातील निलेश धोखिया आणि महेश जेठवा हे दोन अत्यंत जिवापाड प्रेम करणारे मित्र. महेश ने निलेशची चाकूने वार करून हत्या केली. निलेशला दोन मुलं आहेत, निलेश धोखिया हा माझ्या बहिणीशी फोनवर बोलत असतो. असा संशय महेश जेठवा यास आला. त्यानंतर संशयाचे भूत त्याच्या मनाशी वाढत गेल्याने त्याने त्याचा खून केला 3 फेब्रुवारी मंगळवारी दुपारी साधारण तीन वाजून 30 मिनिटांच्या सुमारास ही हत्तीची घटना घडली. विवाहित बहिणी सोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयामुळे हे भयावाहकृत घडल्याचं समोर आला आहे आधी संशय बळावला आणि संशयाचे रूपांतर द्वेषात बदललं आणि मित्रानेच मित्राचा जीव घेतला.
राजकोट शहरातील माधव हॉटेल जवळ निलेश आणि महेश या दोघा मित्रांमध्ये तीव्र वाद झाला वादाचा रूपांतर हाणामारीत झालं त्यानंतर महेशने निलेश्वर चाकूच्या सहाय्याने जीवघेणे वार केले निलेशच्या छाती आणि पोटावर गंभीर दुखापती झाल्या निलेश हा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला उपचारासाठी त्याला स्थानिकांनी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून अवघ्या 44 सेकंदात ही हत्या करण्यात आल्याचं त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, महेश जेठवा याची बहीण प्रज्ञा ही निलेश याच्यासोबत फोनवर बोलते असं संशय प्रज्ञाच्या पतीला होता. याबाबतची माहिती तिच्या पतीने महेशला दिल्यानंतर महेशच्या मनात निलेश विषयी तीव्र राग निर्माण झाला आणि या रागातूनच ही हत्या झाल्याचं पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
महेश ने निलेशची हत्या केल्यानंतर तो स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आणि मीच माझ्या मित्राचं खून केल्याची कबुली त्यांनी त्या ठिकाणी दिली या संपूर्ण प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या आरोपी मित्र महेश पोलिसांच्या ताब्यात आहे याविषयीचा सखोल तपास हा पोलिसांकडून सुरू आहे मात्र संशयाच्या एका ठिणगीने दोन कुटुंबांचे आयुष्य हे उध्वस्त झाल्याचे भावना या घटनेतून समोर आली आहे.









