बिर्याणी आणि कलिंगड खाऊन चार जणांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळ वळण..! ना बिर्याणी, ना कलिंगड; शरीरात विषारी द्रव्य गेलं कसं?

---Advertisement---

 

दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. सुरुवातीला अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, तपासात कलिंगड, बिर्याणी आणि पाणी यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर आता तपासाचा फोकस पूर्णपणे बदलला आहे.

या प्रकरणात आता सर्वात मोठा प्रश्न समोर आला आहे- मृतांच्या शरीरात मॉर्फिन शिरलं तरी कसं?

मोगल इमारतीत सर्वप्रथम उपचार करणारे डॉक्टर डॉ. झैद कुरेशी यांनी या तपासाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. “सुरुवातीपासूनच या प्रकरणाचा चुकीच्या दिशेने विचार झाला असावा. सगळेच त्यांनी काय खाल्लं यावर चर्चा करत आहेत, पण मुख्य प्रश्न आहे, मॉर्फिन शरीरात गेलं कसं?” असे त्यांनी स्पष्ट केले.

मॉर्फिन हे अत्यंत नियंत्रित औषध असून त्याचा वापर प्रामुख्याने गंभीर रुग्णांसाठी, विशेषतः रुग्णालयीन परिस्थितीत केला जातो. अशा औषधाचा सामान्य घरगुती वातावरणात आढळणं हे अनेक प्रश्न निर्माण करत असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले. मृतांच्या शरीरातील मेंदू, हृदय आणि आतड्यांसारखे अवयव हिरवे पडल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे संशय अधिकच गडद झाला आहे.

या घटनेनंतर मोगल बिल्डिंगमधील डोकाडिया कुटुंबाचा बंद फ्लॅट रहिवाशांसाठी भीतीचे केंद्र बनला आहे.
जे. जे. मार्ग पोलीस ठाणे यांनी सांगितले की, तपास सुरू असून फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचा अहवाल लवकरच अपेक्षित आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---