कबूतरांच्या देवाणघेवाणीतून झालेला वाद टोकाला; साक्रीत मित्राकडून मित्राची निर्घृण हत्या…!

---Advertisement---

 

धुळ्याच्या साक्री शहरात मैत्रीला काळिमा फासणारी एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली असून मित्रानेच आपल्या मित्राची धारदार शस्त्राने हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. किरकोळ वाटणाऱ्या कबूतरांच्या देवाणघेवाणीवरून सुरू झालेला वाद अखेर जीवघेणा ठरला.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातल्या साक्री शहरातील नुरानी नगर परिसरात राहणारे शोएब सईद शेख आणि नूर पिंजारी हे दोघे मित्र असून त्यांना कबूतर पाळण्याचा समान छंद होता. या छंदातूनच कबूतरांच्या देवाणघेवाणीवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. सुरुवातीला साधा वाद असलेला हा प्रकार काही वेळातच उग्र झाला.

दिलेल्या तक्रारीनुसार, संतापाच्या भरात नूर पिंजारी याने धारदार शस्त्राने शोएब शेख याच्या पाठीवर, छातीवर आणि गळ्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या शोएबचा घटनास्थळीच मृत्यू झाला. नूर पिंजारीच्या घराच्या छतावर शोएबचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच साक्री पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून धारदार शस्त्र जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित संशयिताविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. किरकोळ कारणावरून वाढणारे वाद किती भयावह वळण घेऊ शकतात, याचे हे पुन्हा एकदा गंभीर उदाहरण ठरले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---