शिपायाचा महाप्रताप, सरकारलाच लावला पाच कोटींचा चुना

---Advertisement---

 

पिलिभीत : उत्तर प्रदेशातील पिलिभीतमध्ये एका शिपायाचा महाप्रताप समोर आला आहे. जिल्हा शाळा निरीक्षक कार्यालयात कार्यरत एका वर्ग ४ कर्मचाऱ्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या ठगबाज शिपायाने बनावट लाभार्थी तयार करुन सरकारी खात्यातून दोन वर्षांत तब्बल पाच कोटी रुपये हडपले आहेत. या महाठगाने ही रक्कम त्याच्या दोन पत्नींसह सासू व सात महिला केली आहे. नातेवाईकांच्या नावे हस्तांतरित याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सात महिलांना अटक केली आहे. इल्हम उर रहमान शम्सी, असे आरोपी शिपायाचे नाव आहे. या ठगबाज शिपायावर कर्मचाऱ्यांची पगार बिले आणि टोकन तयार करण्याची जबाबदार होती. प्रत्यक्षात, एका इंटर कॉलेजमध्ये शिपाई असलेला इल्हम उर हा डीआयओएस कार्यालयात कार्यरत होता. त्याने सहजपणे हा भ्रष्टाचार केला. इल्हमने बनावट लाभार्थी ओळखपत्र तयार करून २०२४ ते २०२६ दरम्यान एका सरकारी खात्यातून तब्बल ५ कोटी रुपये हडपले.

पोलिस उपअधीक्षक विक्रम दहिया यांनी सांगितले की, जिल्हा शाळा निरीक्षक राजीव कुमार यांनी १३ फेब्रुवारीला यासंदर्भात कोतवाली पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत शिपाई इल्हम उरवर बनावट लाभार्थी ओळखपत्रे तयार करणे आणि ट्रेझरी सिस्टीमचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. १२ सप्टेंबर २०२४ पासून आजपर्यंत इल्हमने ९८ व्यवहारांद्वारे त्याची पत्नी अर्शी खातूनच्या खात्यात १,०१,९५,१३५ चा अपहार केला होता. जेव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता ही धक्कादायक तथ्ये समोर आली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---