---Advertisement---
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातल्या निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपला मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. देशासह जळगावमध्येही भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा व लोकप्रतिनिधींचा जल्लोष पाहायला मिळाला.
जळगावमधील भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत एकमेकांना पेढे भरवत व फटाक्यांच्या आतिषबाजीत कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला.
यावेळी सुरेश भोळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत विजयाचा आनंद साजरा करत उत्सवाचे वातावरण निर्माण केले.
देशातील विविध राज्यांतील निकालांचा प्रभाव जळगावमध्येही दिसून आला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.









