“त्याला ठेचून मारा, फाशी द्या” नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपीच्या कुटुंबीयांची संतप्त प्रतिक्रिया….!

---Advertisement---

 

पुणे जिल्ह्यातील नसरापूर गावात चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर आता आरोपीच्या कुटुंबीयांनी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर येत आपली भूमिका मांडली आहे. या घटनेनंतर त्यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया देत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

घटना ज्या ठिकाणी घडली, त्याच ठिकाणी आरोपीला ठेचून मारलं पाहिजे, अशी भावना व्यक्त करत आरोपीची पत्नी ढसाढसा रडली. “मला अकरा नातवंड आहेत. घटना घडल्यापासून मी अन्नपाणी घेत नाही. त्या चिमुरडीच्या आईवडिलांवर काय बीतत असेल, याची कल्पना करूनही अंग शहारतं,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी सांगितले की, “गेल्या दहा वर्षांपासून आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. तो घरी राहत नव्हता. आम्ही मायलेकरं वेगळे राहत होतो. त्याने आमच्याकडे लक्ष दिलं नाही.”

आरोपीच्या पत्नीने पूर्वीच्या आरोपांबाबतही भाष्य करत सांगितले की, “त्याच्यावर याआधीही काही आरोप झाले होते, मात्र घरात त्याने आमच्या मुलींवर अत्याचार केले नाहीत. जर असं काही घडलं असतं, तर मी स्वतः तक्रार केली असती. माझ्या सात मुली आहेत, मी गप्प बसले नसते.”

आरोपीच्या मुलानेही संतप्त प्रतिक्रिया देत वडिलांच्या कृत्याचा निषेध केला. “तो माझा बाप आहे हीच माझी चूक आहे. त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी. त्याने जे कृत्य केलं, त्यासाठी त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे,” असे त्याने म्हटले. तसेच, “आरोपीला लोकांच्या हवाली करून ठेचून मारलं पाहिजे,” अशी तीव्र भावना त्याने व्यक्त केली. “त्याच्या कृत्यामुळे आम्हाला घरदार सोडावं लागलं. आज आमच्या कुटुंबावरही अन्याय होत आहे, पण त्या चिमुरडीला न्याय मिळणं सर्वात महत्त्वाचं आहे,” असेही तो म्हणाला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---