---Advertisement---

जळगावत तीन महिन्याच्या बालकाचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ

---Advertisement---

जळगाव : शहरात रविवारी (१३ जुलै) रोजी अडीच ते तीन महिन्याच्या बालकाचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह अंत्यत विद्रुप व कुजलेल्या अवस्थेत असल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. हे मृत बालक जळगाव-आसोदा रोडवरील एका वीटभट्टीजवळ मिळून आले आहे. दरम्यान , अज्ञात व्यक्तीविरुद्ध तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीटभट्टी व्यावसायिक अशोक पुंडलिक कुंभार (वय ४३, रा. हनुमान नगर, रामेश्वर कॉलनी, मेहरून, जळगाव) हे आसोदा शिवारात आपला व्यायसाय करतात. हा वीटभट्टीचा व्यवसाय ते संजू हरी ढाके यांच्या शेतात चालवतात. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास कुंभार हे आपल्या वीटभट्टीवर विटा घेण्यासाठी गेले असता, त्यांना एका लहान बाळाचा मृतदेह दिसला. हे बाळ अंदाजे अडीच ते तीन महिन्यांचे असून ते अत्यंत विद्रुप स्वरूपात दिसले.

---Advertisement---

या बाळाचा चेहरा कुजलेला, डोळे बाहेर आलेले आणि डावा पाय गुडघ्यापासून तुटलेला होता. त्याच्या अंगावर एक रुमाल टाकलेला होता. ही घटना पाहताच अशोक कुंभार यांनी तात्काळ आसोदा गावातील बाळू रामकृष्ण पाटील आणि पोलीस पाटील आनंदा सीताराम बिऱ्हाडे यांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर त्यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करून मृत अर्भकाला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. अशोक कुंभार यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञात आरोपीने या लहान बाळाला जन्मानंतर गुप्तपणे या ठिकाणी टाकून दिले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. जळगाव तालुका पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---