गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यात रंगले वाकयुद्ध ; आरोप प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं…..!

---Advertisement---

 

जळगावच्या राजकारणात पुन्हा आरोप-प्रत्यारोपाची आग उठली आहे. मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची लढाई रंगली, पण त्यावर आता एकनाथ खडसें आणि गुलाबराव पाटील हे भिडले आहे.

“एकनाथ खडसेंनी आमच्या अनेकांना जेलमध्ये टाकलं, त्यामुळे आज त्याला हे भोगावे लागत आहे. मंत्रांपासून लोकांना भीती नव्हे, तर संरक्षण वाटले पाहिजे. माजी मंत्र्याची बॅग उचलायला ही कुणी सोबत राहत नाही.” असं गुलाबराव पाटील म्हणाले.

त्यावर पलटवार करत एकनाथ खडसे यांनीही निशाणा साधला आहे, “मुक्ताईनगरमध्ये गुंड प्रवृत्ती व दादागिरी विरोधात मी भाजपला मदत केली. मी जे गुंड व भ्रष्ट लोक आहेत त्यांना जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न करतोय आणि करत राहीन. गुलाबराव पाटील जेव्हा जिल्हा परिषदेचे सभापती होते, तेव्हा मी पालकमंत्री होतो. माझी मदत त्यांना आमदार बनवण्यासाठी सहाय्यभूत ठरली. इतके वर्ष पालकमंत्री असताना स्वतःची नगरपालिका निवडून आणू शकले नाहीत, त्यामुळे दुसऱ्यावर बोलण्याचा अधिकार नाही – आत्मचिंतन करावे….!”

या आरोप-प्रत्यारोपामुळे जिल्ह्यातील राजकारण मात्र चांगलच तापलं आहे, आणि आता ही लढाई फक्त निवडणुकीपुरती मर्यादित नसून राजकीय प्रतिष्ठा आणि ताकदीच्या लढाईत रूपांतरित झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---