---Advertisement---
जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरामध्ये काहीही कारण नसताना एका तरुणाला त्याचा रस्ता अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खिशातून ब्लेडने छातीवर व पाठीवर वार करून जखमी केल्याची घटना सोमवार (१३ नोव्हेंबर) रोजी सकाळी ९.३० वाजता घडली आहे. या संदर्भात दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, संदीप पप्पू पाटील (वय-२४ रा. हरीविठ्ठल नगर जळगाव) हा तरुण आपल्या कुटुंबीय सह वास्तव्याला आहे. दरम्यान सोमवारी (१३ ऑक्टोबर) रोजी सकाळी ९.३० वाजता परिसरात राहणारा भज्या कोळी (रा. हरीविठ्ठल नगर ) याने काहीही कारण नसताना संदीप पाटील याच्या पाठीवर व पोटावर धारदार ब्लेडने वार करून त्याला गंभीर दुखापत केली.
जखमी झालेल्या संदीप पाटील याचेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी दुपारी ३ वाजता संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारा भज्या कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ज्याचा पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल उषा सोनावणे ह्या करीत आहेत.