---Advertisement---

Jalgaon Crime News: गच्चीवर झोपलेल्या तरुणीचा विनयभंग; जाब विचारणाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला

by team

---Advertisement---

जळगाव : तालुक्यातील दापोरा येथे गच्चीवर झोपलेल्या एका तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी तरुणीचे कुटुंबीय गेले असता त्यांच्यावर संशयिताने धारदार हत्याराने हल्ला चढविला. या हल्ल्यात तरुणीचा मामा गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शनिवारीच्या मध्यरात्री फिर्यादीचे कुटुंबीय आपल्या घराच्या गच्चीवर झोपले होते. यावेळी त्यांच्या भाचीच्या आरडाओरड्याच्या आवाजाने त्यांना जाग आली. यावेळी विनोद अरुण सोनवणे हा पळून जात असल्याचे दिसले. यावेळी तरुणीने सांगितले की, झोपेत असताना कोणीतरी तिच्या पायाला स्पर्श करत असल्याची जाणीव झाली. जाग येताच विनोद सोनवणे पायाजवळ उभा असल्याचे तिला दिसले, त्यामुळे ती घाबरून किंचाळली.

सकाळी या प्रकाराबाबत जाब विचारण्यासाठी पीडित तरुणीचे कुटुंबीय हे विनोद सोनवणेच्या घरी गेले. यावेळी विनोदने त्यांना शिवीगाळ करीत अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने घरातून धारदार शस्त्र आणून तरुणीच्या मामावर हल्ला चढविला. या हल्ल्यात त्याच्या पोटात वार झाला असून, खांद्यावरही गंभीर इजा झाली आहे.

जखमी अवस्थेत तरुणीच्या मामाला तातडीने जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात विनोद सोनवणेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment