---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील जिरायतपाडा गावात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. घराच्या अंगणात लघुशंकेसाठी गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका तरुणाने पाशवी अत्याचार केला. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास लघुशंकसाठी घराबाहेर अंगणात गेली होती. त्याच वेळी, गावातील स्नेहल दिलीप पावरा या तरुणाने तिचे तोंड दाबून व हात बांधून जबरदस्तीने तिला अंधारात ओढत नेले. त्यानंतर एका बंद घरात नेऊन तब्बल पाच तास तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती पीडित मुलीने दिली आहे.
पीडिता पहाटे ४ वाजेच्या सुमारास घाबरतेल्या अवस्थेत घरी परतली. कुटुंबीयांनी विचारणा केल्यानंतर तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली, त्यानंतर वडिलांनी तात्काळ ग्रामीण पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी आरोपी स्नेहल दिलीप पावरा याच्याविरुद्ध अत्याचार, अपहरण आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली आहे. त्याता न्यायातपात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा तपास डीवायएसपी आण्णासाहेब घोलप, ग्रामीण पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शेषराव नितनवरे करत आहेत.
हा अमानुष प्रकार उघडकीस आल्याने गावात संतापाचे वातावरण असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.