नशिराबाद येथे प्रौढाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये मानसिक व आर्थिक त्रासाचा उल्लेख, पोलिसांकडून तपास सुरु….!

---Advertisement---

 

नशिराबाद शहरातील प्रमोद पुरुषोत्तम पाटील (वय अंदाजे प्रौढ) यांनी नशिराबाद येथील हॉटेल आस्वाद येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली असल्याची माहिती मिळाली असून त्या चिठ्ठीत त्यांनी परेश सुभाष पाटील व सुभाष यशवंत पाटील यांच्याकडून होत असलेल्या मानसिक त्रासाचा उल्लेख केल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद पाटील यांनी परेश पाटील यांच्यासोबत भागीदारीतून हॉटेल आस्वाद सुरू केले होते. मात्र काही कारणांमुळे हे हॉटेल मागील काही दिवसांपासून बंद होते. दरम्यान, संबंधित हॉटेल ज्या शेतजमिनीत सुरू होते ती जमीन परेश सुभाष पाटील व सुभाष यशवंत पाटील यांच्या मालकीची असल्याने त्यांनी अचानक हॉटेल खाली करण्यास सांगितल्याचे समजते. त्याबदल्यात कोणताही मोबदला देण्यास ते तयार नसल्यामुळे प्रमोद पाटील यांना मानसिक त्रास होत असल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केल्याची माहिती मिळाली आहे. या मानसिक तणावातूनच प्रमोद पुरुषोत्तम पाटील यांनी हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.

दरम्यान, संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी व आरोपींना अटक करावी या मागणीसाठी मृतदेह नशिराबाद पोलीस स्टेशन येथे आणण्यात आला होता. पोलीस प्रशासनाकडून योग्य तपास करून न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी नशिराबाद पोलीस अधिक तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---