मुलांच्या क्रिकेट खेळण्यावरून वाद; एका कुटुंबाला लोखंडी सळईने बेदम मारहाण करून लूटमार, अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

---Advertisement---

 

शहादा- अक्कलकुवा शहरातील मक्राणीफळी भागात मुलांच्या क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादातून एका कुटुंबाला लोखंडी सळईने बेदम मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व दागिने लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास मक्राणीफळी येथील गल्लीत मुले क्रिकेट खेळत होती. खेळताना चेंडू फिर्यादी शबाना रफिक काझी यांच्या घराच्या एसी च्या पंख्याला लागला. फिर्यादीने मुलांना हटकल्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी, त्यांचे पती आणि मुलगा यांना लोखंडी सळईने मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या पतीच्या डोक्याला, तोंडाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. मारहाण करत असतानाच आरोपींनी फिर्यादीच्या हातातील सोन्याची अंगठी आणि खिशातील एकूण ४४,००० रुपये (२१,५०० + २,५०० + २०,०००) जबरदस्तीने काढून घेतले व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी रफिक तमोयोद्दीन मक्राणी, आसिफ युसुफ मक्राणी, सलीम जाहीर शेख, वसीम तमीज शेख आणि समीर मक्राणी यांच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सारंग नवलकर करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---