शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘फार्मर आयडी’साठी २० मेपर्यंत अंतिम मुदत

---Advertisement---

 

राज्यातील शेतकरी बांधव-भगिनींसाठी महत्त्वाची सूचना आहे. ज्यांनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. नोंदणीसाठी शेतकरी आपल्या जवळच्या सेवा सुविधा केंद्राला भेट देऊ शकतात किंवा स्वतः ॲग्रीस्टॅक पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात.
राज्यात १४ नोव्हेंबर २०२४ पासून ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून, १५ एप्रिल २०२५ पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांनी अजून नोंदणी केलेली नाही, त्यांनी २० मे २०२६ पूर्वी आपला फार्मर आयडी काढणे आवश्यक आहे.


सध्या राज्यात एकूण १.७१ कोटी खातेदार असून त्यापैकी १.३२ कोटी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी घेतला आहे. यापुढे कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच बियाणे, खते, औषधे यांसारख्या कृषी निविष्ठा मिळवण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक असणार आहे.
नोंदणी प्रक्रियेत अडचण आल्यास संबंधित विभागातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---