---Advertisement---

सावधान ! डेंग्यूचा उद्रेक वाढला, आठवड्याभरात आढळले अकरा रुग्ण

by team

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात डेंग्यूचा उद्रेक वाढला आहे. मागील एक आठवड्यात जिल्ह्यातील डेंग्यू रुग्णांची संख्या ११ वर पोहचली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे डेंग्यूचे ६ रुग्ण आढळले होते. यानंतर जळगाव तालुक्यात ५ रुग्ण आढळून आले होते. डेंग्यूच्या प्रादुर्भावाने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या दोन्ही गावांमध्ये आरोग्य विभागाने विशेष दखल घेत या परिसरात अॅबेटींगसह सर्वेक्षण करण्यात येत आहे.


मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे ६ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. तसेच जळगाव तालुक्यातील नशिराबादमध्ये पाच रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होतांना दिसत आहे. जिल्ह्यात डेंग्यू रुग्णांची संख्या आठवड्याभरात ११ वर जाऊन पोहचली आहे. जिल्ह्यात पावसाळ्याच्या सुरूवातीलाच साथीच्या आजारांनी थैमान घातल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.


घरोघरी जाऊन तपासणी

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. बाळासाहेब वाबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे, पांढरे वैद्यकीय अधिकारी डॉ. करिश्मा जैन, तालुका हिवताप पर्यवेक्षक चंद्रशेखर महाजन यांच्या नेतृत्वात आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्या पथकामार्फत नशिराबाद गावात घरोघरी पाणी साठवलेल्या स्थळांची तपासणी करून डासांची अळी आढळून आलेली भांडी खाली करण्यात आली.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून जिल्हा शासकीय महाविद्यालय येथे नशिराबाद येथील रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत नशिराबाद येथील बारादरी मोहल्ला येथे ३ व मण्यारमोहल्ला येथे १ व निमगाव येथे १ असे एकूण ५ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत.

असा करा डेंग्यूपासून बचाव

डेंग्यू हा आजार टाळण्यासारखा आहे. फक्त योग्य काळजी घेणे आणि स्वच्छता राखणे आवश्यक आहे. डेंग्यूपासून बचावासाठी खालील उपाययोजना करणे आवश्यक आहे. जसे रात्री झोपतांना मच्छरदाणी वापरा, घरात व घराबाहेर पाणी साचू देऊ नका, पूर्ण बाह्यांची कपडे घालवित, कीटकनाशकांची फवारणी करा.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment