भिडे गुरुजी संतापले! “अशोक खरातला मारून टाका, आणि चर्चा सुद्धा करू नका” खरात प्रकरणावर गुरुजींचं विधान…!

---Advertisement---

 

राज्यभर गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणात आता आणखी एक मोठा वाद निर्माण झाला आहे. भोंदू नराधम अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संभाजी भिडे अर्थात भिडे गुरुजी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

भिडे गुरुजींनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत, “अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं, या प्रकरणावर चर्चा सुद्धा करू नये,” असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अनेक महिलांचे लैंगिक शोषण, धमकावून जमीन-मालमत्ता बळकावणे आणि आर्थिक फसवणूक केल्याचे आरोप त्याच्यावर आहेत. या प्रकरणात काही राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांशी संबंध असल्याच्या चर्चाही रंगत आहेत.

तपास यंत्रणांनी या प्रकरणात मोठी कारवाई सुरू केली असून खरातशी संबंधित संस्थांची बँक खाती सील करण्यात आली आहेत. त्याच्या आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू असून, कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या मालमत्तेचीही चौकशी केली जात आहे. बेनामी मालमत्तेचा संशय व्यक्त केला जात असून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार उघड होण्याची शक्यता आहे.

विशेष तपास पथक (SIT) या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून राज्यभरातील मालमत्तेची माहिती गोळा केली जात आहे. याशिवाय आयुर्वेदिक औषधे आणि जडीबुटी विक्रेत्यांची चौकशी होण्याची शक्यता असून, काही ज्वेलर्सही तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.

तसेच, सायबर पोलिसांकडून व्हाट्सऍप व इतर डिजिटल डाटाचे पुनर्प्राप्ती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोबाईलमधील संभाषण, सीसीटीव्ही फुटेज, डीव्हीआर आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली असून तपासाला वेग आला आहे.

सध्या भोंदू अशोक खरात विरोधात नाशिकसह विविध ठिकाणी एकूण १० गुन्हे दाखल असून, हे सर्व गुन्हे एकत्रित करून SIT मार्फत तपास केला जात आहे.

दरम्यान, भिडे गुरुजींच्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले असून कायदेशीर आणि सामाजिक स्तरावर याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---