सर्व सामान्यांना मोठा धक्का! आता पेट्रोल डिझेलसह घरगुती गॅसच्या किमतीचा उडणार भडका? इतक्या रुपयांनी महागणार?

---Advertisement---

 

नवी दिल्ली : देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी चिंतेची बातमी समोर येत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने येत्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस (LPG) सिलिंडरच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण-अमेरिका तणावासह इतर भूराजकीय घडामोडींमुळे कच्च्या तेलाचा पुरवठा प्रभावित झाला आहे. यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींनी मोठी उसळी घेतली असून, सध्या त्या 120 डॉलर्सच्या पुढे गेल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असली तरी भारतात इंधन दर स्थिर ठेवण्यात आले होते. मात्र आता तेल कंपन्यांवरील आर्थिक ताण वाढल्याने दरवाढ टाळणे कठीण होऊ शकते.


मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 4 ते 5 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल 50 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरवाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती खर्चावर होणार असून, महागाईतही भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांचे आर्थिक गणित पुन्हा एकदा बिघडण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---