Gold Silver High Rate: ग्राहकांना मोठा झटका, २४ तासात सोन्या-चांदीच्या भावात विक्रमी वाढ; दराने गाठला ‘इतक्या’ लाखांचा टप्पा, जाणून घ्या भाव ?

---Advertisement---

 

Gold Silver High Rate : सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी धक्कादायक घडामोड समोर आली आहे. दर कमी होण्याची अपेक्षा असताना उलट सोन्याने मोठी झेप घेतली आहे. मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाचा थेट परिणाम स्थानिक सराफ बाजारावर दिसून येत आहे.

Israel आणि Iran यांच्यात उभ्या ठाकलेल्या संघर्षामुळे जागतिक आर्थिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम म्हणून सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानल्या जाणाऱ्या सोन्याकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढून दर झपाट्याने चढत आहेत. त्याचे पडसाद जळगावच्या सराफ बाजारातही उमटले.

गेल्या २४ तासांत जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या दरात तब्बल ९ हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली. शनिवारी सकाळी बाजार उघडताच प्रतितोळा दरात ६ हजार ५०० रुपयांची उसळी पाहायला मिळाली. दुपारी सुमारे ३ वाजता पुन्हा १ हजार ५०० रुपयांची वाढ झाली. त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता आणखी १ हजार रुपयांची भर पडली. दिवसअखेर जीएसटीसह प्रतितोळा सोन्याचा दर १ लाख ७३ हजार ४० रुपये इतका नोंदवण्यात आला.

युद्ध किंवा आंतरराष्ट्रीय तणाव वाढला की शेअर बाजारासह इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये अनिश्चितता वाढते. अशा वेळी गुंतवणूकदार पारंपरिक सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. त्यामुळे मागणी वाढते आणि दरात झपाट्याने चढ-उतार होतात. सध्या देखील तीच परिस्थिती दिसून येत आहे.

मध्यपूर्वेतील संघर्ष किती काळ टिकतो आणि त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर काय तोडगा निघतो, यावर पुढील दरांचा कल अवलंबून राहणार आहे. तणाव कायम राहिल्यास दरात आणखी वाढ होण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सोन्याचा दर १ लाख ७३ हजारांच्या पातळीवर पोहोचल्याने लग्नसराईसाठी खरेदी करणारे तसेच गुंतवणुकीचा विचार करणारे ग्राहक चिंतेत पडले आहेत. अनेकांनी सध्या खरेदी थांबवून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

आगामी काही दिवसांत जागतिक घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरांवर दिसत राहण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मात्र ग्राहकांनी सावधगिरीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---