श्री साईबाबा आणि श्री खाटुश्यामच्या भक्तांसाठी मोठी खुशखबर; ‘ही’ विशेष ट्रेन आता जुलैपर्यंत धावणार….!

---Advertisement---

 

शिर्डी साईबाबा आणि राजस्थानमधील खाटुश्याम दर्शनासाठी रेल्वेने जाणाऱ्या भाविकांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने साईनगर शिर्डी-बिकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे सेवेच्या संचालन कालावधीत पुन्हा वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भाविकांसह व्यावसायिक, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गाडी क्रमांक ०४७१५ बिकानेर-साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष गाडी २८ मार्चपर्यंत दर शनिवारी चालविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून अधिसूचित करण्यात आले होते. मात्र, या गाडीचा कालावधी आता ११ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत एकूण १५ सेवा या गाडीच्या होतील.

तसेच गाडी क्रमांक ०४७१६ साईनगर शिर्डी-बिकानेर ही साप्ताहिक विशेष गाडी २९ मार्चपर्यंत दर रविवारी चालविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून अधिसूचित करण्यात आले होते. या गाडीचा कालावधी आता १२ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत एकूण १५ सेवा या गाडीच्या होतील.

बिकानेर-साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष गाडीला या स्थानकांवर आहेत थांबा?

या दोन्ही विशेष गाड्यांना अप आणि डाऊन मार्गावर मनमाडसह भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, नागदा, शामगढ, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर, ढेहर का बालाजी, रिंगस, सीकर, लक्ष्मणगढ, फतेहपूर शेखावाटी, चुरू, रतनगढ, राजलदेसर आणि श्री डूंगरगढ, अशा प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---