---Advertisement---
जळगाव: भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी पक्षातील संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये सक्रिय कार्यकर्ते श्री. संजय बाबुराव विसपुते यांची ‘जळगाव महानगर जिल्हा विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीचे अधिकृत पत्र जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले. संजय विसपुते यांच्या आजवरच्या संघटनात्मक कामाची पावती म्हणून पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
सदर नियुक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, तसेच जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवणार
“राष्ट्र प्रथम, एकात्म मानवतावाद आणि अंत्योदय” या भाजपच्या विचारधारेवर विश्वास ठेवून केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास नवनियुक्त जिल्हाध्यक्ष संजय विसपुते यांनी यावेळी व्यक्त केला.
या निवडीबद्दल राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.









