---Advertisement---
जळगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (त्रिशताब्दी वर्ष) जयंतीनिमित्त शहरासह जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. याच अनुषंगाने जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघ मल्हार सेना,कर्मचारी संघटना, अहिल्या महिला संघ, जीएम फाउंडेशन व शतायु हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आज रविवारी (१ जून ) रक्तदान शिबीरचे घेण्यात आले. या शिबिरात सर्व जाती-धर्माच्या लोकांनी रक्तदान केले.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सर्व जाती धर्मातील लोकांसाठी लोकोपयोगी कार्य केले आहे. त्यांच्या लोकोत्तर कार्याचे न्यायनिष्ठ राज्यकारभाराच्या आणि सार्वजनिक हितासाठी दिलेल्या योगदानातून उतराई होण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतींना कृतीतून अभिवादन करण्याचा प्रयत्न रक्तदान शिबिराद्वारे करण्यात आला. संस्कृती, परंपरा आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतीक त्यांच्या कार्याची ओळखच असते. महामातेचा आदर्श जपताना मानवतेची सेवा करूया अहिल्यादेवी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन रक्तदान शिबिर घेण्यात आले.

या रक्तदान शिबिर प्रसंगी दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, मल्हार सेनेचे माजी सरसेनापती सुभाष सोनवणे, धनगर समाज महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष करे, मल्हार सेनेचे सरचिटणीस संदीप तेले, गणेश बागुल, मयूर ठाकरे,अरुण ठाकरे, पांडुरंग पवार,किशोर कंखरे, डॉ. सिद्धांत घोलप, तुळशीराम सोनवणे, प्रवीण पवार, संदीप मनोरे, ऍड.शरद न्हाळदे,दिलीप धनगर, प्रभाकर न्हाळदे, रमेश सुलताने, प्रभाकर कवडे,डॉ. संजय पाटील,कल्पेश चौधरी, ऍड. रिषीराव सोनवणे, रामचंद्र चऱ्हाटे,डिंगबर सोनवणे, चंद्रकांत कंखरे आदींची उपस्थिती होती. या रक्तदान शिबिराचे नियोजन संदीप तेले,गणेश बागुल, मयूर ठाकरे यांनी केले होते.
---Advertisement---