---Advertisement---

लाच घेऊन पळ काढणाऱ्या लाचखोर ग्रामपंचायत अधिकाऱ्याला अमळनेरात अटक ; धुळे लाचलुचपत पथकाची कारवाई

by team
---Advertisement---

जळगाव : शासकीय बांधकाम ठेकेदाराकडून ४० हजारांची लाच स्वीकारून पळ काढणाऱ्या लाचखोर ग्रामपंचायत अधिकाऱ्याला धुळे लाच लुचपत विभागाच्या पथकाने अटक केली. दिनेश वासुदेव साळुंखे असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई सोमवारी (१९ मे ) अमळनेर येथे करण्यात आली असून लाचखोर अधिकाऱ्याकडून हॅश व्हॅल्यू व मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

तक्रारदार हे शासकीय बांधकाम ठेकेदार आहेत. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधार अंतर्गत पारोळा तालुक्यातील तामसवाडी ग्रामपंचायतचे रस्ता कॉंक्रिटीकरणाचे पाच लाख किमतीचे काम घेऊन पूर्ण केले होते. या कामाचे चार लाखाचे बिलाचा चेक दिनेश साळुंके यांनी तक्रारदार यांना दिला होता. दरम्यान, ही रक्कम तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा झाली होती त्यानंतर तक्रारदार व त्यांचे चुलत काका असे तक्रारदार यांनी घेतलेल्या दुसऱ्या कामाची चौकशी करण्याकरिता सुमारे 7 दिवसांपूर्वी तामसवाडी ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. यावेळी तक्रारदार यांच्याकडे त्यांना अदा केलेल्या बिलाच्या रकमेच्या १० टक्के प्रमाणे ४० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्यासंदर्भात तक्रारदार यांनी दूरध्वनीद्वारे लाच लुचपत पथक, धुळे यांना माहिती दिली. या माहितीवरून लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या धुळे पथकाने पारोळा येथे जाऊन तक्रारदार यांची भेट घेऊन त्यांची तक्रार नोंदवून घेतली.

या तक्रारीची १९ मे रोजी पडताळणी केली असता दिनेश साळुंखे याने तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम दिनेश साळुंखे याने अंमळनेर येथे दगडी दरवाजा समोर राजे संभाजी चौकात स्वतः स्वीकारली. यानंतर त्याने तेथून दुचाकी वरुन पळ काढला. नंतर त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लाचलुचपत प्रतिबंध धुळेचे पोलीस उपाधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी यांच्या पथकाने सापळा रचला होता. पथकात पोलीस हवालदार राजन कदम, पो. कॉ. प्रशांत बागुल

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment