सावदा शिवारात गांजाची शेती उघड; पोलिसांकडून ९३ झाडे जप्त, एक जण ताब्यात….!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील सावदा परिसरात अवैध गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सावदा पोलिसांनी धडक कारवाई करत शेतातून तब्बल ९३ गांजाची झाडे जप्त केली असून या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सावदा-फैजपूर मार्गावरील गुरुकुल इंग्लिश स्कूलजवळील बहिरम बुवा देवस्थान परिसरात एका शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी १० मार्च रोजी दुपारी छापा टाकला.

छाप्यामध्ये गट क्रमांक ४६३ मधील शेतात ९३ गांजाची झाडे आढळून आली. ही झाडे पोलिसांनी तात्काळ जप्त केली. जप्त केलेल्या मुद्देमालाचे एकूण वजन सुमारे २८ किलो ५४० ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत सुमारे १ लाख ९४ हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

या कारवाईदरम्यान कृषी विभागाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी तसेच फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी निलेश रमेश पाटील (वय ४०, रा. सावदा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संबंधित आरोपीविरुद्ध NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सावदा पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---