---Advertisement---

मुख्यमंत्री सहायता निधीचा जळगावातील गरजू रुग्णांना आधार

by team
---Advertisement---


जळगाव : जिल्ह्यातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष उभारण्यात आले आहे. या मदत कक्ष जिल्हात प्रथमच १ मे पासून जिल्हाधिकारी कार्यलयात सुरु करण्यात आला आहे. या कक्षातच्या वतीने आजपर्यंत २१ अर्जांवर कार्यवाही करण्यात आली आहे. पहिल्या दोन रुग्णांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीचे पत्र पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थितीत होते.

रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य मिळवण्याची प्रक्रिया आता जिल्हास्तरावरच पारपार पडली जात आहे. हा उपक्रम जिल्ह्यात प्रथमच राबविण्यात येत आहे. या कक्षातर्फ आतापर्यंत एकूण २१ अर्जांवर कार्यवाही करण्यात आली आहे. त्यात पहिल्या दोन रुग्णांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीचे पत्र प्रदान करण्यात आले. यानुसार शुक्रवार, १६ मे रोजी ग्लोबल कॅन्सर हॉस्पिटल, जळगाव येथे उपचार घेत असलेले दौलत बंडू सोनवणे व न्युक्लियस हॉस्पिटल येथील रुग्ण जिजाबाई अशोक पाटील यांना उपचारासाठी प्रत्येकी 1 लाख रुपये मदतीचे पत्र रुग्णांच्या नातेवाईकांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यापूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया मुंबई येथे पार पडत होती. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना वेळ, पैसा व गैरसोयींचा सामना करावा लागत होता. मात्र, मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व रामेश्वर नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून ही प्रक्रिया जिल्हास्तरावर आणण्यात आली आहे. यामुळे गरजू रुग्णांना तातडीने मदत मिळवणे शक्य झाले आहे. रुग्ण व नातेवाईकांनी या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री व लोकप्रतिनिधींप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment