जळगाव : बालमनातील सृजनशीलतेला वाव देणाऱ्या ३० दिवसीय बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप शुक्रवारी (३१ मे ) रोजी रोजलँड इंग्लिश मिडियम शाळेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. जननायक थिएटर ग्रुप, जी.एम. फाउंडेशन, भवरलाल-कांताबाई जैन फाउंडेशन आणि आमदार सुरेश भोळे सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले होते.
३४ बाल कलाकारांचा सहभाग, १२ मुलींचा उत्स्फूर्त सहभाग विशेष
या शिबिरात ३४ बाल कलाकारांनी सहभाग घेतला होता, ज्यामध्ये १२ मुलींचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. शिबिरादरम्यान बाल कलाकारांच्या अभिनयकौशल्य, संवादाभिव्यक्ती, आत्मविश्वास आणि सृजनशक्तीत उल्लेखनीय वाढ झाल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले.

“चरणदास चोर” – बोलीभाषांतील पहिलंवहिलं सादरीकरण
शिबिराचा मुख्य आकर्षण ठरले ते “चरणदास चोर” या बहुचर्चित नाटकाचे अहिराणी व तावडी बोलीभाषांतील सादरीकरण. प्रसिद्ध रंगकर्मी होनाजी चव्हाण यांनी या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. स्थानिक भाषेला प्राधान्य देत सादर झालेल्या या प्रयोगाने प्रेक्षकांची मनं जिंकली. सह-दिग्दर्शक प्रदीप भोई, संगीत संयोजनासाठी जयंत महाजन, रुपेश ठाकूर, निर्मल राजपूत, रोहित ठक्कर आणि खुश बाविस्कर यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.
“शिवबा छत्रपती झालं ग” आणि नृत्यमय योगा कार्यक्रमाची शोभा वाढवणारे
नाट्यप्रयोगासोबतच, “शिवबा छत्रपती झालं ग” या नृत्याविष्काराने आणि नृत्यमय योगाच्या सादरीकरणानेही कार्यक्रमाला विशेष रंगत दिली. या सादरीकरणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
नाट्यकलेतील विविध अंगांचे सखोल प्रशिक्षण
शिबिरात मुलांना नाट्यलेखन, दिग्दर्शन, अभिनय, संवाद कौशल्य, नेपथ्य रचना, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, नृत्य, गान, शरीराभिव्यक्ती आणि योग यांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. प्रमुख प्रशिक्षक म्हणून होनाजी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले, तर सहप्रशिक्षक म्हणून प्रदीप भोई, डॉ. सोनल महाजन, मयुर अहिरराव, जयंत महाजन, रुपेश ठाकूर, निर्मल राजपूत आणि रोहित ठक्कर यांनी योगदान दिले.
उद्घाटन आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते; मान्यवरांचे उपस्थितीत गौरव
कार्यक्रमाचे उद्घाटन आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी गिरीश महाजन फाउंडेशनचे जितेंद्र पाटील होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते हेमराज चव्हाण, ज्येष्ठ रंगकर्मी पियुष रावळ, चिंतामण पाटील आणि अरुण सानप उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सर्व बाल कलाकारांना प्रशस्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यकर्त्यांचे समर्पित योगदान
शिबिराच्या यशस्वी आयोजनात राणी चव्हाण, अमोल सोनवणे, ज्ञानेश्वरी राणे, प्रतीक परदेशी, रोहन कुरकुरे, कबीर परदेशी, रोहित ठाकरे, पीयूष पाटील, रुद्रांशी पाटील, शीतल नेवे, मुकेश व सुमित राठोड यांनी अत्यंत समर्पणाने भूमिका बजावली.
प्रशासन व संस्थांचे सहकार्य
कार्यक्रम व्यवस्थापनासाठी ॲड. शिवाजी सोनार, दीपक तायडे, अनिल जोशी, मोहन थत्ते, सुनील वाणी, भरत अमळकर, दिलीप चोपडा, तेजस पाठक, संतोष ठाकूर, तसेच रोझलँड शाळेच्या मुख्याध्यापिका भावना शिंपी व अनुभूती शाळेचे व्यवस्थापक मनोज धारकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
गिरीश महाजन यांचा व्हिडिओ संवाद; यशपाल शर्मा व प्रतिभा सुमन यांच्याकडून शुभेच्छा
कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शिबिरार्थींशी संवाद साधला. त्यांनी आपल्या कॉलेज जीवनातील नाट्यप्रवासाचे अनुभव सांगत मुलांना प्रेरणा दिली. तसेच प्रसिद्ध अभिनेता यशपाल शर्मा यांनी देहरादूनहून, तर चित्रपट दिग्दर्शिका प्रतिभा सुमन यांनी मुंबईहून व्हिडिओ कॉलद्वारे बाल कलाकारांशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या