---Advertisement---

Chopda News : जप्त केलेल्या २३ वाहनांची होणार लिलावाव्दारे विक्री

by team
---Advertisement---

जळगाव : –चोपडा तालुक्यातील वाळूची अनाधिकृतपणे उत्खनन व वाहतुक करतांना आढळून आलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही वाहने ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा येथे लावण्यात आलेली आहेत. वाहन मालक यांना वाळूची अनाधिकृत उत्खनन व वाहतुक केल्याने दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आले आहेत. परंतु, संबंधित वाहन मालकांनी दंडात्मक रकमेचा भरणा न केल्यामुळे जप्त वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. वाहनांवर जमीन महसुलाची थकबाकी समजून उक्त नमुद तरतूदीनुसार जप्त वाहनांचा लिलाव करून लिलावातुन प्राप्त होणारा महसुल शासनास जमा करण्याची कार्यावाही करण्यात येणार आहे. तरी खालील वाहनांची लिलावाची प्रक्रिया तहसिल कार्यालय चोपडा येथे शुक्रवार 23 मे रोजी करण्यात येणार आहे.

वाळूची अवैध वाहतुक करीत असतांना २३ वाहने जप्त करण्यात आली आहेत. यात ट्रॅक्टर व ट्रॉलींचा समावेश आहे. जप्त वाहने पुढील प्रमाणे, वाहन क्रमांक, चेसिस नंबर, ट्रॉली माहिती तसेच अंदाजित किंमत विभागाने प्रसिद्ध केली आहे. काही महत्त्वाच्या जप्त वाहनांमध्ये MH 18 BR 1729, MH 18 AA 5747, MH 19 CY 4993, MH 19 BG 1475, MH 19 AN 3329, आदींचा समावेश आहे.
जप्त वाहनांची सुनावणी २३ मे रोजी तहसील कार्यालय, चोपडा येथे होणार आहे. लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी लिलावात भाग घेण्याचा अर्ज, लिलाव होणाऱ्या मालमत्तेची हातची किंमत, अनामत रक्कम तसेच लिलावाच्या अटी व शर्ती या करिता चोपडा येथील तहसिल कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन चोपड्याचे तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

वाळू चोरी ठरतेय प्रशासनासाठी डोकेदुखी
चोपडा तालुक्यात वाळूच्या अवैध वाहतुकीचा प्रश्न ऐरणीर आला आहे . अनेक वेळा महसूल प्रशासनातर्फे या वाळू तस्करांवर कारवाई करण्यात येत असते . मात्र , हे मुजोर वाळू तस्कर प्रशासनाला न जुमानता वाळूची अवैध उपसा व वाहतूक करीत आहेत . वाळूची चोरटी वाहतूक करणारे वाहन सुसाट वेगाने धावतात, या सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची समस्या वाढीस आली आहे. त्यामुळे वाळूसह इतर गौण खनिजांची होणाऱ्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यात यावा अशी मागणी सर्वसामन्यांतून होत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment