---Advertisement---
जळगाव : शहरातील अस्थिचोरीच्या स्मशानभूमीत घटना घडत असल्यामुळे महापालिकेने चारही स्मशानभूमीत सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यासह सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील मेहरूण व शिवाजी नगर स्मशानभूमीतून अस्थी चोरीस जाण्याच्या घटना घडल्या होत्या. लागोपाठ झालेल्या या घटनांमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.
सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षकाची मागणी
स्मशानभूमीत घटना घडल्यामुळे या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत तसेच सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. त्याबाबत महापालिकेत चोरीच्या निवेदनही देण्यात आले होते.
आरोग्य विभागातर्फे प्रस्ताव
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरातील नेरी नाका, पिंप्राळा, मेहरूण व शिवाजी नगर स्मशानभूमीत सीसीटीव्ही लावण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच सुरक्षा रक्षक आठ तासाच्या शिफ्टने नियुक्त करण्याबाबत प्रस्ताव देण्यात आला होता.
प्रस्तावाला मंजूरी
आरोग्य विभागाकडून आलेल्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडून तत्काळ मंजूरी देण्यात आली आहे. आता त्याच्या निवीदा काढून त्वरीत त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येवून सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.