---Advertisement---

Covid-19 कोरोना प्रतिबंध : महापालिकेतर्फे जय्यत तयारी ; शिवाजीनगर रूग्णालयात सहा बेड सज्ज

by team

---Advertisement---


जळगाव : मुंबईत कोरोनाचे संशयीत रूग्ण आढळले आहेत. यानंतर शासनाने राज्यातील वैद्यकीय विभागांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे. यानुसार जळगाव महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने जय्यत तयारी केली आहे. महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी नगर परिसरातील भिकमचंद जैन रूग्णालयात सहा बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. जागतिक व स्थानिक पातळीवर सध्या भारतात व महाराष्ट्रात कोव्हीडचे रुग्ण आढळून येत आहे. ओमीक्रोन व्हरायन्ट चा उपभाग JN1 प्रकारचा आहे. लक्षणे सौम्य आहेत व प्रसार सुद्धा कमी तीव्रतेचा आहे. जळगाव शहरातही सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर महापालिकेचा वैद्यकीय विभाग सुसज्ज ठेवण्यात आला आहे.

खालीलप्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे

अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये.

मास्कचा वापरः सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी आणि आजारी व्यक्तींच्या संपर्कात असताना मास्क लावावा. मास्क योग्य प्रकारे नाक व तोंड झाकेल असा वापरावा.


सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर): किमान ६ फूट अंतर ठेवावे. गर्दी टाळावीः

वारंवार हात धुणेः साबण व पाण्याने किमान २० सेकंद हात धुवावेत. सॅनिटायझरचा वापर करावा (६०% पेक्षा अधिक अल्कोहोल असलेले),

स्वच्छता व शिस्तः खोकताना/शिंकताना तोंडावर रुमाल/कोपर लावावा. वापरलेले मास्क / रुमाल स्वच्छ करावेत.

लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणीः ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, स्वाद/वासना जाणं बंद होणे अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य कर्मचाऱ्या सोबत संपर्क साधावा.

सहा बेड राखीव
कोरोना प्रतीबंधासाठी तयारीबाबत महापालिकेच्या वैद्यकिय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कि छत्रपती शिवाजी नगरातील भिकमचंद जैन रुग्णालयात ऑक्सीजनसह सज्ज ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी ऑक्सीजन सिलेंडर, कॉन्सट्रेटरही उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. तसेच सर्व प्रकारची औषधी उपलब्ध करण्यात आलेली आहे. डॉक्टरांचे पथकही तैनात करण्यात आले आहे. चोवीस तास पथक तयार ठेवण्यात आले आहे.

सावधानता बाळगावी
कोरोना प्रतिबंधासाठी नागरीकांनीही सावधानता बाळगावी असे अवाहन महापालिका वैदयकिय विभागातर्फे करण्यात आली आहे. याबाबत सूचनापत्रही जारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment