पाचोरा येथील एसटी बस स्थानकात जामनेर तालुक्यातील तीन महिलांना पिकपॉकेट व टेहाळणी करतांना पाचोरा गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले असून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून 32 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून गुन्हा उघडकिस आणला आहे.
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दिनांक ०३/११/२०२५ रोजी दुपारी १५.१५ ते १५.४५ वाजेच्या सुमारास फिर्यादी श्रावण ताराचंद पाटील ( वय-७०) ( रा. वडगांव खुर्द, ता. पाचोरा) हे पाचोरा बसस्थानक येथे बसमध्ये चढत असतांना कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांच्या पॅन्टच्या खिशातून १३,४०० रुपये चोरुन नेले. याबाबत पाचोरा पोलीसात दि.४/११/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने दिनांक २३/०२/२०२५ रोजी पाचोरा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.हे.कॉ. राहुल काशिनाथ शिंपी, पो.कॉ शरद मांगो पाटील, पो.कॉ. श्रीराम अनिल शिंपी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पाचोरा बसस्थानक येथे तिन संशयीत महिला हया पिकपॉकेट व टेहाळणी करीत असल्याची बातमी मिळताच बसस्थानक येथे जाऊन सदर महिलांना ताब्यत घेत त्यांना पाचोरा पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांना पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी चौकशी केली यात, १) निर्मला सुनिल जोशी (वय – ३३) ( रा. गंगापुरी, ता. जामनेर), २) सोनाली गणेश विधाते (वय-२४) (रा. मु. हिसोडा खुर्द, पोस्ट. सेलुद, ता. भोकरदन, जि. जालना, ह.मु. कुंभारी, पोस्ट. तोंडापुर, ता. जामनेर), ३) उषाबाई तेजराव ऐकणार( वय-५५) (रा. कुंभारी, पोस्ट. तोंडापुर, ता. जामनेर) असे सांगीतल्याने त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिल्याने पंचासमक्ष व महिला पोलीस अंमलदार यांचेसमक्ष त्यांची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत आरोपी क्रमांक १ यांचेकडुन १३,५००/- रुपये, आरोपी क्रमांक २ यांचेकडुन ६,६००/- रुपये, आरोपी क्रमांक ३ यांचेकडुन १२,३००/- रुपये असे एकुण ३२,४००/- रुपये जप्ती पंचनामा करुन जप्त करण्यात आले असून या तिन्ही महिलांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ राहुल काशिनाथ शिंपी हे करीत आहेत.
सदरची कामगिरी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगांव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर, पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापु रोहम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पो.हे.कॉ राहुल काशिनाथ शिंपी, पो.हे.कॉ अशोक रामचंद्र हटकर, पो.कॉ शरद मांगो पाटील, पो.कॉ श्रीराम अनिल शिंपी, म.पो.कॉ प्रियंका अर्जुन आहेर, म.पो.कॉ/महोमगार्ड सोनाली शशीकांत पाटील, होमगार्ड कल्पना तानाजी निंबाळकर, महोमगार्ड संगीता मुरलीधर पाटील, यांनी पार पाडली आहे.