---Advertisement---

Crime News : एमआयडीसी परिसरात तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या

---Advertisement---

जळगाव : शहरासह जिल्ह्यात आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. अशीच एक घटना जळगाव एमआयडीत उघड झाली आहे. एका २२ वर्षीय परप्रांतीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना बुधवारी (११ जून ) रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील जय आनंद दाल मील कंपनीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अजय बुधराम पाटील (वय-२२, रा. एमआयडीसी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

अजय पाटील हा मूळचा मध्यप्रदेशातील नेपानगर येथील रहिवाशी आहे. मागील तीन वर्षांपासून त्याचे वास्तव्य जय आनंद दाल मील कंपनीच्या खोल्यांमध्ये होते. त्याच्या सोबत त्याची पत्नीदेखील राहत होती. ह्या कंपनीत काम करुन जीवन चरितार्थ चालवीत होता. अजयने बुधवारी (१२ जून ) रोजी रात्री पत्नीसोबत जेवण केले. यानंतर त्याची पत्नी घराबाहेर भांडे धुण्यासाठी गेली होती. याच वेळी अजय घरात जात दोरीने गळफास घेतला.

---Advertisement---

गळफास घेतल्याची बाब अजयच्या पत्नीने लक्षात येताच तीने मदतीसाठी आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून तिच्या शेजाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली. त्यांनी अजयला खाली उतरवून तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस कॉन्स्टेबल मुकुंद पाटील हे पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---