नंदुरबार : जिल्ह्यातील शहादा पोलीस ठाणे हद्दीतील असलोद दूरक्षेत्र अंतर्गत घोटाळीपाडा शिवारात एका व्यक्तीने शेतात गांजाच्या झाडांची बेकायदेशीर लागवड केलेली होती. शेतात पथकाने जाऊन तपासणी केली असता तेथे गांजा सदृश्य झाडांची लागवड करुन जोपासना केल्याचे दिसून आले. या ठिकाणाहून एकूण १४० किलो ५३० ग्रॅम वजनाचा १४ लाख पाच हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शेतात बेकायदेशीर गांजा लागवड केल्या प्रकरणी सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन माल ताब्यात घेण्यात आला. याबाबत अशोक जामसिंग चव्हाण, सुभाष जामसिंग चव्हाण, दोन्ही रा. घोटाळीपाडा, ता. शहादा, जि. नंदुरबार या दोघां भावांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम ानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा उपविभाग दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहादा प्रभारी सपोनि राजन मोरे, पोउपनि मुकेश पवार, शहादा पोउपनि- अभिजीत अहिरे, स्थागुशा अंम लदार पोहेकॉ मुकेश तावडे, सजन वाघ, बापू बागुल, विशाल नागरे, सुनील पाडवी, पुरुषोत्तम सोनार, विकास कापूरे, अविनाश चव्हाण, अभिमन्यू गावीत, दीपक न्हावी, शोएब शेख, यशोदीप ओगले, रामा चव्हाण शहादा पोलीस ठाण्याचे अंमलदार असई / कोळी, पोहेकॉ योगेश थोरात, घनश्याम सूर्यवंशी, भरत उगले, दिनकर चव्हाण, युवराज राठोड, पवार यांनी केली आहे.