जळगाव: जळगाव तालुक्यात भादली येथे क्षुल्लक वादातून माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी (मूळ रा. कानसवाडा, ह. मु. भादली, ता. जळगाव) यांचा धारदार शस्त्राने, तर भुसावळ शहरातील कुविख्यात गुन्हेगार मुकेश भालेरावचा खून उघडकीस न येण्यासाठी मृतदेह पुरला. या दोन्ही खुनांच्या घटनांनी जिल्हा हादरला आहे. उपसरपंच खून प्रकरणी देवेंद्र ऊर्फ देवा भरत पाटील या संशयिताला एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. भुसावळ रहस्यमय घटनेचा पोलीस कसून तपास करीत आहेत.भुसावळातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात हद्दपार गुन्हेगार मुकेश प्रकाश भालेरावची मारहाण करीत हत्या करण्यात आली व खून उघडकीस न येण्यासाठी मृतदेहाचा परस्पर दफनिवधी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आला. वाढत्या खुनांच्या घटनेने भुसावळ शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय असून, चार संशयितांना चौकशीकामी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुकेश भालेराव पोलिसांच्या रेकार्डवरील संशयितखून झालेला मुकेश प्रकाश भालेराव (32, टेक्निकल हायस्कूलमागे, भुसावळ) हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, अलीकडेच त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेची, तसेच हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. शिवाय, पंधरवड्यापूव शहरातील काहींशी त्याचा वाद झाल्याने या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.होळीच्या दिवशी हत्या; मध्यरात्री दफनविधीसूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी (13 मार्च) मुकेश भालेराव हा मध्यरात्री घरी आल्यानंतर संशयितांना चाहूल लागली व त्यांनी मध्यरात्रीच त्याचा खून करीत मृतदेह यावल रोडवरील तापी नदीपात्राजवळील काकाचा ढाबामागील घनदाट जंगलात पुरला. खुनाच्या कारस्थानात महिलेसह मनोज राखुंडे याचा सहभाग पोलीस चौकशीत स्पष्ट झाला आहे. शहर पोलिसांनी मनोज राखुंडेसह चार संशयितांना ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती व गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अशी झाली उकल
संशयिताने दाखवली जागाहोळीच्या दिवशी खून झाल्यानंतर संशयित बिनधास्त वावरत होते. मात्र, भुसावळ शहर पोलिसांना खुनाची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपासाला वेग देत संशयित पोलीस ठाण्यात आणला व त्यास बोलते करताच त्याने खुनाची कबुली देत मृतदेह पुरल्याचे सांगितले. फॉरेन्सिक टीम तसेच डॉक्टरांच्या उपस्थितीत दफन केलेला मृतदेह ट्रामा सेंटरमध्ये विच्छेदनासाठी हलविण्यात आला. नायब तहसीलदार व डॉक्टरांच्या उपस्थितीत शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती. या वेळी भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उद्धव डमाळे व सहकारी उपस्थित होते.हद्दपार गुन्हेगारांचा शहरात वावरखून झालेला मुकेश भालेराव हा हद्दपार गुन्हेगार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. हद्दपार असतानाही गुन्हेगार शहरात येण्याची हिंमत करतात कशी? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.