---Advertisement---

Crime News : प्रेयसीला व्हिडीओ कॉल करत लॉजमध्ये संशयित आरोपीची आत्महत्या

by team
---Advertisement---

अमळनेर : सध्या, प्रेम प्रकरणातून तरुण – तरुणींमध्ये आत्महत्या करण्याचे प्रकार घडत असल्याचे उघड होत आहे . यात काहींना फसविण्यात आल्याने ते नैराश्यातून आपले जीवन संपवीत असल्याचे धक्कादायक प्रकार घडताना समोर येत आहे. यातच अमळनेरच्या एका लॉजमध्ये परराज्यातील पोस्कोचा गुन्हा दाखल असलेल्या एका आरोपीने आपल्या प्रेयसीशी व्हिडीओ कॉल करुन मी आता ‘ऑपरेशन मौत’ जवळ पोहोचल्याचे सांगत आत्महत्या केली आहे. याबाबत अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सौरभ शर्मा (रा. अहमदाबाद) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत वृत्त असे कि, अमळनेर येथील पाठक प्लाझा येथे गेल्या पाच ते सहा दिवसापासून अहमदाबाद येथील सौरभ शर्मा हा त्याचे नाव बदलून राहत होता. त्याने करणसिंग एम.पी. या नावाने लॉजमध्ये रुम बूक केली होती. घटनेच्या आदल्या रात्री सौरभने लॉजमधील कर्मचा-यांना मला सकाळी उशिरा उठवा, असा निरोप दिला होता. मंगळवार ( १३ मे) दुपारी लॉजचे कर्मचारी त्याला उठवायला गेले तेव्हा त्याने आवाज दिला नाही. दरवाजा आतून बंद होता. सायंकाळी पुन्हा त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता आवाज आला नाही म्हणून पोलिसांना बोलावण्यात आले.

पोलिसांनी घटनास्थळी येत सौरभ याच्या रूमचा दरवाजा तोडला. रुममध्ये प्रवेश करताच पोलिसांना सौरभने गळफास घेतल्याचे आढळून आले. दरम्यान, सौरभवर गुजरातमध्ये पोस्कोअंतर्गंत गुन्हा दाखल आहे. त्याने मृत्यूपूर्वी प्रेयसीशी व्हिडीओ कॉल करून मी ‘ऑपरेशन मौत’ जवळ पोहोचलो आहे असे म्हटले आहे. सौरभने त्याच्या डायरीत त्याला फसविलेल्या मुलीचा व तिच्या नातेवाइकांचा उल्लेख केला असल्याचे समजते. याप्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment