पाचोरा : तालुक्यात एका परराज्यातील पतीने चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची रुमालाने गळा आवळून हत्या केली. ही घटना शुक्रवार, १५ रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपी पतीस पाचोरा पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील गोरखेडा येथे मध्यमप्रदेश मधील कुसम्या येथील रहिवाशी असलेल्या सैय्यादीबाई भाया उर्फ भैय्या चव्हाण ( वय ५२) ही पती भाया उर्फ भैय्या चव्हाण (वय ५८ ) यांच्या सोबत वास्तव्याला होती. भाया उर्फ भैय्या चव्हाण हा तिच्यावर नेहमी चरित्र्याचा संशय घेत होता. याकारणामुळे त्यांचे सतत भांडण होत असे. शुक्रवार १५ रोजी मध्यरात्री १ वाजता पत्नी सैय्यादीबाई झोपलेली असतांना त्याने पत्नीच्या गळ्यात रूमाल आवळून तिचा खून केला.
ही घटना उघड होताच पाचोरा पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. त्यानंतर शेतकरी चंद्रकांत काशिनाथ पाटील (वय ३२ रा. गोराडखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी भाया उर्फ भैय्या चव्हाण याच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार हे करीत आहे.