---Advertisement---

Crime News : घरी एकटा असतांना तरुणाने गळफास घेत संपविली जीवनयात्रा

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात आत्महत्या करण्याच्या घटना वाढीस लागत आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे देखील अशीच घटना समोर आली आहे. पारोळ्यातील एका तरुणाने राहत्या घरी गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघड झाली आहे. ही घटना रविवारी (१५ जून) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास समोर आली. याबाबत पारोळा पोलीस स्थानकांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भूषण सुभाष चौधरी (वय ३२, रा. स्वामीनारायण नगर, पारोळा) असे मयत तरुणाचे नाव आहे.

भूषण चौधरी हा आपल्या आई, वडील, भाऊ, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा यांच्यासह स्वामीनारायण नगरात वास्तव्याला होता. दरम्यान, रविवारी (१६ जून) रोजी तो घरी एकटाच होता. रात्री त्याने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्याचे कुटुंबीय घरी आले असता ही घटना उघड झाली.

त्याला तत्काळ पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला. तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याच्या या घटनेमुळे पारोळा शहरात शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---